संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागर जी गुरुदेव यांच्या अवतरण दिनानिमित्त शिरपूर यात्रा

 

श्री दिगंबर जैन युवक मंडळ (सैतवाल) व महिला शाखेच्या वतीने आचार्य श्री विद्यासागर जी गुरुदेव यांच्या अवतरण दिनानिमित्त भगवान श्री १००८ अंतरिक्ष पारसनाथ शिरपूर तीर्थक्षेत्र येथे सर्व गुरु भक्तांसाठी यात्रा काढण्यात आली. महिला शाखेला अवतरण दिनानिमित्त गुरुभक्ती, गुरुपूजनाचा विशेष लाभ मिळाला आणि गुरुदेवांचा आशीर्वाद मिळाला. सर्व गुरु भक्तांनी मोठ्या उत्साहात पूजा करून गुरुदेवांचा आशीर्वाद घेतला. सर्व गुरू भक्तांना शिरपूर तीर्थ क्षेत्रासह भातकुली तीर्थ क्षेत्राचा दर्शनाचा लाभ मिळाला. सर्व भक्तांचे स्वागत सत्कार श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. मंडळांचे अध्यक्ष विनय सावळकर व कार्यवाह प्रशांत भुसारी यांनी ही धार्मिक यात्रा यशस्वी केल्याबद्दल संपूर्ण कार्यकारिणीचे कौतुक केले. महिला शाखा अध्यक्षा प्रतिभाताई नखाते व त्यांच्या सर्व कार्यकारिणींचे यात्रा यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य लाभले. संचालन राजेश जैन तर आभार अविनाश शाहकार यांनी मानले. किशोर महात्मे, सुनील भुसारी, उमेश फुलंबरकर,संजय भरडे,सावळकरजी, विनोद उबाळे,अनिल महात्मे,मायाताई सावलकर,भारती उबाळे,नीता भुसारी, जयश्री भुसारी, मनीषा सावलकर, अर्चना शाहकार, वैशाली मानेकर, माधुरी भुसारी, विना झवेरी, संध्या काळे , स्मिता महात्मे , रुपाली फुलबारकर , माधुरी बोबडे , अरुणा पळसापुरे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
सुर्या मराठी न्यूज़ साठी उमेश सावळकर नागपुर

Leave a Comment