कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केला संग्रामपूर मित्र परिवाराने नवीन उपक्रम
आज दि.23 सप्टेंबर 2020 रोजी संग्रामपूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरात खेकळा मशिनद्वारे प्रमुख रस्ते सार्वजनिक ठिकाणे,धार्मिक स्थळे, बस स्टँड,गर्दीच्या ठिकाणावर प्रत्येक वार्डात मेन गल्लीत सॅनिटायजर फवारणी करण्यात आली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असे अनेक प्रकारचे उपक्रम संग्रामपूर मित्र परिवाराने घेतलेले आहेत.सामाजिक उपक्रमांत संग्रामपूर मित्र परिवार नेहमी अग्रेसर असतो.आजच्या उपक्रमाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि बोलताना या उपक्रमाची वाह वाह देखील केली.असेच समाजोपयोगी उपक्रम संग्रामपूर मित्र परिवार नेहमी घेत राहणार अशी ग्वाही संग्रामपूर मित्र परिवाराच्या सदस्यांनी दिली.
ना तोटा ना नफा
नागरिकांच्या मनाची समाधानी हाच आमचा नफा
संग्रामपूर मित्र परिवार..