सकल धनगर समाजाचे तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

 

अडगांव बु प्रतिनिधी: दिपक रेळे

तेल्हारा तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी धनगर समाजाला भारतीय राज्यघटनेनुसार अनुसूचित जाती / जमाती सुधारणा अध्यादेश 1956 व 1976 नुसार अनुसूचित जमातीच्या अनुसूची प्रमाणे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याबाबत निवेदन देण्यात आले धनगर समाज आर्थिक सामाजिक राजकीय व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे अतिशय हलाखीचे जीवन जगत आहे जगातील अत्यंत भव्य व विशाल समजल्या जाणाऱ्या लोकशाही देशात त्याचा कुणीही वाली नाही यावेळी धनगर समाजाच्या वतीने जोरदार जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राज्य शासनाने धनगर समाजाचा अंत पाहू नये आज जरी शांततेच्या मार्गाने निवेदन दिले असले तरी याबाबत जर शासनाने निर्णय घेतला नाही तर आमदार-खासदार मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला सदर निवेदन हे तेल्हारा तहसीलदार साहेबांना गोपाल मधुकर राव कोल्हे ,श्रीकृष्ण पुंजाजी वैतकार, जिल्हा परिषद सदस्या सौ मीराताई प्रल्‍हाद पाचपोर, सौ सरिता ताई प्रकाश काईंगे, प्रकाश दादाराव काईंगे, युवा कार्यकर्ते सागर एकनाथ खराटे, अरुण भारत ,वैतकार, विजय प्रल्हादराव पाचपोर, महादेवराव लक्ष्मणराव नागे, सुनिल काशिराम घाटोळ, खंडोजी श्रीराम घाटोळ, देविदास रामभाऊ गावंडे, राजेश रवींद्र रत्नपारखी,ज्ञानेश्वर भिकाजी बाजोड, संदीप दौलतराव गावंडे, अतुल सारंगधर नवल कार, गणेश बाळकृष्ण गावंडे, प्रणव गजानन चिंचोलकार, आकाश तांबळे, जितेंद्र गणेश जाधव, विशाल वसंतराव कातखेडे,अतुल सारंगधर नवल कार, शिवहरी प्रल्‍हाद बाहे, अनिल रत्नपारखी, भिकाजी नागे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Comment