Home Breaking News सततच्या नापिकीला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या !

सततच्या नापिकीला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या !

449
0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून बाळसमुद्र येथील युवा शेतकरी रामेश्वर मेरत यांनी 20 जानेवारी रोजी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील बाळ समुद्र येथील रामेश्वर मेरत त्यांच्याकडे सहा एकर शेती आहे शेती मशागतीसाठी त्यांनी व इतर लोकांकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतली आहे.

 ही बातमी पण पहा एक क्लिक

रोही समोर आल्यामुळे त्याला वाचवण्याच्या नादामध्ये बस रस्त्याच्या कडेला !सुदैवाने चालकाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली !

 

परंतु सततच्या अतिवृष्टी तसेच पिकांचे होणारे नुसकान यामुळे पाहिजे तसे उत्पन्न होत नव्हते त्यामुळे कर्ज आणखीनच वाढत गेलं अशातच निराश होऊन त्यांनी 16 जानेवारीला विषारी औषध प्राशन केले होते .

त्यांना तातडीने बुलढाणा येथे दवाखान्या मध्ये दाखल केले होते तेथे उपचार सुरू असताना 20 जानेवारी रोजी दुपारी रामेश्वर मेरत त्यांची प्राणज्योत मावळली.

त्यांच्या पश्चात त्यांच्या पाठीमागेआई वडील पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.

अतिशय चांगल्या स्वभावाचा रामेश्वर निघून गेल्यामुळे मित्र परिवारामध्ये हळहळ व्यक्त होत आहे !

Previous articleरोही समोर आल्यामुळे त्याला वाचवण्याच्या नादामध्ये बस रस्त्याच्या कडेला !सुदैवाने चालकाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली !
Next articleरोड रोलर नादुरुस्त असल्यामुळे शिंदी – साखरखेर्डा खड्डे बुजवण्याचे काम एका आठवड्यापासून बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here