मागच्यावर्षी ओला दुष्काळ ने शेतकऱ्यांचे कंबर्डे मोडले होते. ते संकट झाले न झाले यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनची दोन ते तीन वेळा पेरणी करावी लागली. असे वाटले उडीद, मुगाचे पीक आम्हाला साथ देईल पण तेही निसर्गाने आमच्यापासून हिवरून घेतले. तिळाचे पीक सुद्धा आले नाही. आणि कपाशी पीक सुद्धा मोठया प्रमाणात जास्त पाण्याने बोड्या सोडल्यामुळे हातातून गेले.
शेतात एवढी कसरत करून सुद्धा रोगराई अतिवृष्टीमुळे सोयाबिनला हिरवा गच्च पाला दिसला पण उत्पन्न मात्र आले नाही. एकरी एक ते दीड क्विंटल पेक्षा कमी उत्पन्न आले असून यात सोयाबिन काढणीचा सुद्धा खर्च निघाला नाही. त्या मुळे आत्ता वर्षभराचा घर खर्च, शिक्षण, आजाराचा खर्च , कसा भागावायचा व उदरनिर्वाह तरी कसा करायचा हाच प्रश्न पडला आहे . पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाल्या मुळे सगळ्या पिकांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांची येणारी दिवाळी अंधारात जाणार आहे. आमच्या मंडळाची नजर अंदाज आनवरी 65 पैसे इतकी दाखवली आहे परंतु उत्पन्ना सारखे दिसत नसतांना नजर अंदाज आणेवारी 65 पैसे आली तरी कशी ? खरं तर ही आणेवारी 30 पैसे च्या आत यायला पाहिजे होती ही वस्तुस्थिती आहे, पण ती खरी आणेवारी दाखवली नाही. तरी आम्हला यात शंका वाटत आहे म्हणुन हा प्रश्न उपस्थित केला आहे. शेतकऱ्यानं पुढे खूप मोठे आर्थिक संकट आहे . म्हणून शेगांव तालुका दुष्काळ ग्रस्थ घोषित करून दुष्काळाच्या सर्व सवलती पीक विमा तात्काळ लागू करण्यात यावा अन्यथा या सवलती लागू न झाल्यास 15 दिवसा नंतर आम्ही सर्व शेतकरी आमच्या कुटुंबासह आपल्या कार्यालयावर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू. याची दक्षता घ्यावी ही विनंती
राजू नाकाडे(जिल्हा संयोजक)
अयाज शेख(युवा आघाडी अध्यक्ष)
आकाश देशमुख(युवा आघाडी)
गणेश सडतकार(युवा आघाडी)
अमीर शहा(अल्प.युवा आघाडी)
शब्बीर शेख(अल्प.ता.अध्यक्ष)
मोहन कवरे(युवा ता.अध्यक्ष)
मनीष खवले(ता.संपर्क प्रमुख)
गणेश भंबेरे(ता.अध्यक्ष)
गोपाल बाठे संजय फाटे अनिल कवडे अनिल गव्हादे
भागवत मिरगे
नथुराम बेळूरकर
विष्णू फायके
शिवा भाऊ पाटील
आत्माराम पाटील
सागर जवंजाळ
गोपाल गावंदे.पवन चव्हाण वसंतराव पहुरकर
शुभम पहुरकर शब्बीर खान मनोज बेलोकार प्रथमेश साळुंके
शेख सत्तार शेख इस्माईल शेख लतीप शेख आजाम व सत्याग्रह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व असंख्य शेतकरी उपस्थित होते