Home Breaking News सांगोळा नदीपात्रातून एका नजीकच्या शेतामधून अवैध वाळूचा उपसा

सांगोळा नदीपात्रातून एका नजीकच्या शेतामधून अवैध वाळूचा उपसा

512
0

 

…. तहसील विभागाचे दुर्लक्ष, शासनाला लाखोंचा चुना.,

अतिशकुमार वानखडे अकोला

पातुर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले गाव म्हणजे सांगोळा, या गावानजीक नदीचे नदी पात्र जोडलेले असून, अनेक शेतकऱ्यांचे शेती नदी पात्राला लागून असल्यामुळे. तसेच नदीपात्रात व नजीकच्या शेतामध्ये वाळूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नदीपात्राच्या नजीक असलेल्या काही शेतकऱ्यांनी शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचे पीक न घेता अवैधरित्या वाळू उपसा करून विक्री चालू असल्याचे या परिसरात चित्र पहावयास मिळत आहे. नदीपात्राचा लिलाव तसेच ज्या शेतामधून अवैधरित्या वाळू उपसल्या जात आहे त्यांनी महसूल विभागाकडून कुठल्याही प्रकारची परमिशन न घेता अवैधरित्या ही वाळू विकल्या जात आहे त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत असून संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनात येत आहे यासंबंधी महसूल विभागाचे संबंधित अधिकारी तसेच अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांचे देवाण-घेवाण करून मिलीभगत असल्याचे परिसरात जोरदार बोलल्या जात आहे. त्यामुळे वाळू उपसा करणार्‍या ना कुणाचा डर नसल्यामुळे राजरोसपणे रात्रंदिवस या परिसरात वाळू उपसा होत आहे. हा परिसर सस्ती मंडळ अधिकारी यांच्या अंतर्गत येत असून मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांचा या परिसरात कुठल्याही प्रकारचा वचक नसल्याने आणि संबंधित वाळू माफियांच्या नेहमी संपर्कात असल्याने. वाळू माफियांवर कुठल्याही प्रकारचा वचक नसल्याचे ही पहावयास मिळत आहे. त्यामुळे शासनाला लाखो रुपयाचा चुना लागत आहे. या परिसरात अवैध वाळू माफिया हे रात्रीच्या वेळेस अवैध वाळू उपसा करून वाळूचे साठवण करून जास्त भावाने वाळू विकत आहेत.

 

चौकट
संबंधित अधिकारी तसेच अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या माफियांची मिलीभगत असल्याचेही परिसरात बोलल्या जात आहे तसेच या परिसरातील एका लोकप्रतिनिधीचेया अवैध वाळू माफियांच्या डोक्यांवर आशीर्वाद असल्याचेही परिसरात जोरदार चर्चेला उधान लागले आहे.. शासनाचे रक्षकच भक्षक बनल्याची अनेक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे..

Previous articleमोहणसिंग डाबेराव यांच्या हद्दपारीच्या आदेशास स्थगिती
Next articleशेतकऱ्यांना दिवसाची वीज देण्यात यावी-धिरज फाटे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here