Home बुलढाणा साखरखेर्डा येथे नाफेड तुर खरेदीचा पालकमंत्री ना . डॉ . राजेंद्र शिंगणे...

साखरखेर्डा येथे नाफेड तुर खरेदीचा पालकमंत्री ना . डॉ . राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते शुभारंभ !

434
0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

येथे नाफेड तुर खरेदीचा शुभारंभ पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते १ फेब्रुवारी रोजी करण्यात आला . मोहाडी येथील शेतकरी श्रीधर काळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला .
शेतकऱ्यांच्या शेत मालाला योग्य भाव मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने तुर , हरबरा , मका या भरड धान्याची खरेदी करुन शेतकऱ्यांना भाव दिला . महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन असो , की नाफेडची खरेदी असो , खरेदीदारांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणे आणि त्यांना मालाचे चुकारे व्यवस्थीत देणे महत्वाचे आहे . मागील काळात तालुका खरेदी-विक्री संघाने तुर खरेदी केली होती. आजही काही शेतकऱ्यांना तुरीचे पैसे मिळाले नाही . या गैरकारभारामुळे शेतकरीच नागावल्या गेला . तो प्रकार होवू नये यासाठी सोन पाऊल अॅग्रो कंपणीने नाफेड मार्फत भरड धान्य खरेदी करतांना विश्वास संपादन केला आहे . चुकारे व्यवस्थीत दीले आहेत . त्यामुळे आज तुर खरेदीचा शुभारंभ करण्यासाठी आलो . येथेही काही गैर प्रकार झाले तर माफी नाही . असे उद्गारही त्यांनी साखरखेर्डा येथील तुर खरेदीचा शुभारंभ करतांना काढले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य राम जाधव हे होते . तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख ,सय्यद रफिक ‘दाऊद सेट कुरेशी ‘ पंचायत समितीचे माजी सभापती राजू ठोके , नाथाभाऊ दराडे , बाळासाहेब बेंदाडे , कांता पाटील वायाळ , मोहाडीचे सरपंच अशोक रिंढे , भानुदास लव्हाळे , श्रीधर काळे सुधीर बेंदाडे , पिंपळगाव सोनारा सरपंच तोताराम ठोसरे , रामदाससींग राजपूत यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन डी एन पंचाळ यांनी केले.

Previous articleबकरी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश
Next articleशिंदी ते साखरखेर्डा खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे !अवघ्या दोन तासात निघाली गिट्टी !डांबराचे प्रमाण अतिशय कमी !पुढे पाठ मागे सपाट !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here