यावल तालुका( प्रतिनिधी) विकी वानखेडे
चुंचाळे ता. यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चुंचाळे येथे ,श्री समर्थ सुकनाथ बाबा तपोभूमी, श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी,श्री समर्थ वासुदेव बाबा यांच्या कर्मभूमि मध्ये गुरुपौर्णिमे निमित्त त्यांच्या शिष्यगण परिवारातर्फे विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.
देशभरातून हजारो भावीक सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चुंचाळे येथील वासुदेव बाबा,रघुनाथ बाबा,सुकनाथ बाबा यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी येतात चुंचाळे सह परिसरातून अध्यात्मिकतेची गंगा प्रगट करणारे वासुदेव बाबा यांचे शिष्यगण गुरु शिष्यातील नाते अखंडीत रहावे या हेतुने गुरुपोर्णीमेचा पर्व साजरा करतात याबाबत सविस्तर असे
सोमवार (दिनांक 03/07/2023) गुरुपौर्णिमेनिमित्त येथे यात्रोउत्सव व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. वासुदेव बाबा मंदिरात हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. भाविकांच्या सेवेसाठी काही रिक्षाचालक भाविकांना मोफत मंदिरा पर्यंत आणून सोडतात. श्री समर्थ वासुदेव बाबा मंदिराच्या सुशोभिकरणासह भाविकांच्या निवास्थानासाठी व्यवस्था करण्याचे कार्य हाती घेतले आहे.यातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. हजारो भाविक रघुनाथ बाबा,वासुदेव बाबांचे दर्शन घेण्यासाठी येतात.
असा होईल कार्यक्रम
पहाटे पाच वाजता मूर्ती अभिषेक, सहा वाजता मारुती अभिषेक, दुपारी साडेबाराला महाआरती,सायंकाळी सातला आरती, सकाळी आठ पासून आरतीची वेळ सोडून भजन, भारुडे सुरू राहतील. दुपारी एक वाजेपासून ते सायंकाळपर्यंत महाप्रसादाचे वाटप होईल.
भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावें असे आवाहन करण्यात आले आहे सायंकाळी पाच गावात वाजेपासून पालखी मिरवणूक निघेल रात्री आठ वाजेल दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होईल.शिरपूर येथील पायी दिंडी चे आगमन आज दिनांक 03/07/2023 ला होणार आहे त्यात तालुक्यातील नायगाव, किंनगाव, दहिगाव, सौखेडा,गिरडगाव, वाघोदा, मानवेल सकाळी या भागांतील भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.