सार्वजनिक नवयुवक गणेश मित्र मंडळाचे 34 वे वर्ष उत्साहात पार पाडले

 

बोदवड प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड :- येथे प्रभाग क्रमांक १६ मधील होळी मैदान माळी गल्ली या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गेल्या 34 वर्षात सार्वजनिक नवयुवक गणेश मित्र मंडळ हे सांस्कृतिक सामाजिक कार्य पद्धतीने लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा,सांस्कृतिक कार्यक्रम असे वेगवेगळे उपक्रम गेल्या 34 वरश्यापासून राबविले जातात.
लहान मुलांना शेवटच्या दिवशी शालेय उपक्रमाचे बक्षिसे वाटप करतात या वर्षी या मंडळाची गणेश मूर्ती आरास 12 फुटाची असून या वर्षा चे तालुक्यातील सर्वात उंच आरास म्हणून या मंडळाचा क्रमांक येतो या मंडळाच्या गणेश मूर्तीची महाआरती करण्यासाठी काल दिनांक ५ रोजी सकाळी १० वाजता आमदार चंद्रकांत पाटील व त्यांची पत्नी यामिनी पाटील या दोघांच्या हस्ते सपत्नीक महाआरती झाली या नंतर महाप्रसाद भांडाऱ्याचे आयोजन करण्यात आले या मंडळाने छान सा देखावा केला तसेच मंडळाच्या माध्यमातून लहान मुलांना शारीरिक कवायती,उत्कृष्ट अशी तालीम देत कुस्त्यांचे शिक्षण दिले जातात पहेलवान दल म्हणून या मंडळाचे नाव चर्चेत आहे या मंडलचे स्वतःचे लेझीम पथक आहे आहे या मंडळाचे अध्यक्ष अजय माळी व उपाध्यक्ष बंटी सपकाळ सचिव आकाश माळी व सर्व मंडळाचे सदस्य यांच्या सहकार्याने दहा दिवस सामाजिक सलोखा जोपासून पार पाडतात अशी माहिती त्यांनी दिली

Leave a Comment