सावंगी-पाहेगाव चौफुली ते नेर पाथरूड ते रामनगर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था,सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष:

 

(तुकाराम राठोड/जालना)

प्रतिनिधी:(जालना)तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून,सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.अशी नागरिकांची दिवसेंदिवस मागणी होत.तरीपण सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नाही.सदर रस्त्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष होत असून,बांधकाम विभागाचे अधिकारी झोपेचे सोंग घेत आहे. की काय अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.तसेच मागील बऱ्याच दिवसापासून सावंगी-पाहेगाव चौफुली ते नेर व पाथरूड ते रामनगर रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे.त्यामुळे रस्त्यावर जागो-जागी खड्ड्यामध्ये पाणीच पाणी साचले आहे.तसेच ऐजा करणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.तसेच एसटी बस सेवा मागील बऱ्याच दिवसापासून बंद आहे.सदर ठिकाणी ये जा करणाऱ्या प्रवासांना खाजगी वाहनांना जास्त प्रमाणात भाडा द्यावा लागत आहे.तसेच ग्रामीण भागातील ऐजा करणारे नागरिकांना व वाहनधारकांना याचा फार मोठा त्रास होत असून,याचा भुर्दंड त्यांना सोसावं लागत आहे.या रस्त्यावरुन दवाखान्यामध्ये जाण्यासाठी नागरिकांना विलंब लागत असल्यामुळे अनेकांना आपलं जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागातील रस्त्याची त्वरित देखभाल दुरुस्ती व डाग करावी व नवीन रस्त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावे अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.अन्यथा आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन केली जाईल अशी मागणी तुकाराम राठोड,राजु राठोड,संजय रंधवे,शिवाजी राठोड,गजानन चव्हाण,राधाकिसन बावणे यांनी केली आहे.

Leave a Comment