Home Breaking News सासऱ्यानेच झाडली सुनेवर गोळी

सासऱ्यानेच झाडली सुनेवर गोळी

567
0

 

 

हिम्मतराव तायडे
महाराष्ट्र ब्युरो चीफ

बाळापूर तालुक्यातील बोरवाकडी येथील घटना
जखमींवर सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू

पैश्याच्या देवान-घेवान वरून झालेल्या वादात सासऱ्याने चक्क सुनेवर बंदुकीची गोळी झाडल्याची घटना बाळापुर तालुक्यातील बोरवाकडी येथे शनिवार रात्री दरम्यान घडली. सुनेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर सर्वोपचार रुग्नालयात अकोला येथे उपचार सुरू आहेत.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सोनाली अक्षय क्षीरसागर हि विवाहीत महीला पतीसोबत बोरवाकडी येथे राहते. दरम्यान विवाहितेचा सासरा मोहन भाऊराव क्षीरसागर हे काही दिवसापासून भरतपूर येथे राहायला गेले होते.सोनाली व सासरे मोहन क्षीरसागर यांच्या मध्ये पैशाच्या देवाण घेवाण वरून वाद होते. मोहन क्षीरसागर हे भरतपूर येथून बोरवाकडी येथे आले असल्याची माहिती मिळतात झांगो पाटील यांचे घराच्या अंगणात माझ्या सासऱ्यांना तुम्ही का बोलावले अशी विचारणा सोनाली करीत असतांना मागाहून आलेल्या मोहन क्षीरसागर यांनी सोनाली हिच्यावर बंदुकीची गोळी झाडली त्यामध्ये पाठीवर गोळी लागल्याने जखमी झालेल्या सोनालीला नातेवाईकांनी तात्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठुन घटनेचा पंचनामा केला.तसेच सोनाली क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळापुर पोलिसांनी मोहन क्षीरसागर यांचे विरुद्ध कलम ३०७, ३२६, शस्त्र कायदा कलम ३,२५ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी पुढील तपास बाळापुर पोलीस करीत आहेत.

Previous articleशेतकर्या ना सुरळीत वीजपुरवठा करा अन्यथा तीव्र आंदोलन
Next articleझरी येथे सहा गाई बेवारस मिळाल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here