सिंदखेड राजा तालुक्यात आजपासून क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम सुरू !लोकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे तालुका वैद्यकीय अधिकारी …….डॉ . महेंद्र साळवे यांचे आव्हान !

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

बहुप्रतिक्षित शयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम आरोग्य विभागाची 1 डिसेंबर पासून सिंदखेडराजा तालुक्यामध्ये सुरु झाली आहे !तालुक्यातील चार पी एस सी केंद्रातील कर्मचारी या शोध मोहिमेमध्ये कार्यरत आहे !यामध्ये आडगाव राजा मलकापूर पांग्रा सिंदखेड राजा व साखरखेर्डा येथील पी एस सी केंद्राचा समावेश आहे !या मध्ये आशा स्वयंसेविका आरोग्य सेविका व आरोग्य सेवक सुपरवायझर म्हणून राहणार असून !आज पासून संपूर्ण तालुक्यामध्ये कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम घरोघरी जाऊन त्यांची तपासणी होणार आहे त्यांचा शोध आरोग्य कर्मचारी घेणार आहेत !यासाठी अगोदर तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आशा स्वयंसेविका आरोग्य सेवक आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी यांच्या बैठका घेऊन त्यांना आरोग्य तालुका अधिकारी डॉक्टर महेंद्र साळवे यांनी मार्गदर्शन केले आहे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले आहे !आज जागतिक एडस् दिनानिमित्त सुद्धा सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये लोकांना किट व मार्गदर्शन करण्यात आले -तर क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम मध्ये लोकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे व स्वतःहून असलेल्या आजाराची माहिती न लपवता द्यावी असे आवाहनही सिंदखेडराजा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेंद्र साळवे व ग्रामीण रुग्णालय सिंदखेडराजा च्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनीता बिराजदार यांनी केली आहे !

Leave a Comment