प्रचार तोफा शांत झाल्या
इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात दिनांक ५ व ६ जुलै रोजी दोन मंडळामध्ये अतिवृष्टी व ढगफुटी झालेली असून प्रचंड नुकसान होऊन शेतीचे मोठे नुकसान झालेले असल्यामुळे नैसर्गिक आपत्ती विचारात घेऊन सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलणे
बाबत दिनांक ४/८/ 2023 चे पत्रांनी प्राधिकरणाकडे विनंती केली होती तथापि महाराष्ट्र कृषी उत्पन्न पनण( विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 14( 3 )अनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्याचे अधिकार शासनास प्राप्त असल्याने प्राधिकरणाने संदर्भ क्रमांक 3 चे पत्रांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदखेडराजा या बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रिये बाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करून उचित आदेश होण्यास शासनाकडे विनंती केली होती
त्यानुसार शासनाने संदर्भ क्रमांक 4 चे पत्रांनी राज्यातील जून नंतर पर्जन्यमानाचे स्वरूप जास्त असल्याने उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती पावसामुळे जनजीवन व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता तसेच सदर परिस्थिती पूर्व पदावर येण्यास लागणारा कालावधी विचार घेता सहकार विभागाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका दिनांक 30 /9 /2023 पर्यंत पुढे ढकलण्याबाबतचे दिनांक 28 /6 /2023 रोजी आदेश निर्गमित केलेले आहेत
त्याप्रमाणे सिंदखेड राजा तालुक्यातील उपरोक्त नमूद नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती विचारात घेता कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदखेडराजा या बाजार समितीची निवडणूक 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात चे निर्देश डॉ पि एल खंडागळे सचिव ,राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांना दिले आहेत