सिंदीकरांनी दाखविली मद्दतीची आपुलकी रेल्वे स्थांनकावर थांबलेल्या प्रवाश्यांना भरविले मायेचे जेवन

 

सिंदी रेल्वे ता.११ : मुसळधार पाऊसामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक सोमवारी (ता.१०) आकस्मिक थांबविल्याने अटकुन पडलेल्या शालिमार एक्स्प्रेस मधील प्रवाशांना जेवनाची व्यवस्था करुन सिंदीकरांनी दाखविली मायेच्या मद्दतीची आपुलकी……!

सविस्तर वृत्त असे की, हावडा-मुंबई मार्गावर माना स्थानकाजवळ मुसळधार पाऊसाने रेल्वे रुळा खालचा भराव वाहुन गेल्यांने सुरक्षिततेच्या कारणाने सोमवारी (ता. १०) रात्री ७ वाजता पासुन रेल्वे वाहतुु थांबविण्यात आली होती.

या दरम्यान दुपारची शालिमार एक्स्प्रेस ७ वाजता पासून रात्री उशीरापर्यंत अनिश्चित काळासाठी थांबुन होती. विशेष म्हणजे दैनदिन गरज लक्षात घेता संपुर्ण गाडीतील प्रवाशांचे पुरेल ऐवढी खाण्यापिण्याची व्यवस्था सिंदी रेल्वे स्थानकावर नाही अशा परिस्थितीत गाडीतील महीला, लहान मुल, वयोवृद्ध स्त्री पुरुष आदी प्रवाशांचे भुकेने हाल होत होते.

अशा परिस्थितीत मात्र ८०%कृषी प्रधान असलेले पोला सिटी सिंदी रेल्वे म्हणुन दूरवर ख्याती असलेले सिंदी कर आले मद्दतीसाठी धावुन सर्व प्रवाशांना रात्री साडेअकरा वाजता भरविला मायेचा घास दिले भरपेठ जेवन….!

योगायोग असा झाला कि दरवर्षी प्रमाने फार पुरातन काळापासून चालत आलेल्या शहरातील सार्वजनिक हनुमान मंदीरात आज एक्का म्हणजे अखंड टाळ सप्ताहाची समाप्ती होती त्यानिमित्ताने पंचक्रोशीतील सर्वाना महाप्रसादाचे हनुमान मंदिर सप्ताह कमेटी आणि शहरवासीयांच्या वतीने आयोजन असते. दुपारी तीन वाजतापासुन महाप्रसादाच्या पंक्ती सुरू होतात. या रात्री उशीरापर्यंत चालतात. लगतच्या पंचविस खेड्यातील आणि शहरातील भावीकभक्त महाप्रसादाचा लाभ घेतात.

मात्र रात्री जेवन सुरु असतांनाच सदर घटनेची माहिती मिळाली आणि लागलीच नेहमी मद्दतीसाठी धावुन जाण्याची ख्याती असलेले सिंदीकर क्षणाचाही विलंब न करता या प्रवाशांच्या मद्दतीसाठी धावुन गेले.

गरजेच्या वेळी मिळालेली मदत पाहुन प्रवाशी भारावून गेले त्यांचे हुद् य गदगद झाले त्यांच्या तोंडुन आभार आणि कौतुकाची भेट सिंदी करांना मिळाली

Leave a Comment