सुनगाव येथे ग्रामीण कुटा अंतर्गत कोरोना जनजागृती

 

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी नव्या दिशा संस्थे अंतर्गत क्रेडिट एक्सेस लिमिटेड ग्रामीण कुटा मार्फत सूनगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर जनजागृती करण्यात आली यावेळी कंपनीचे विकास अधिकारी सुपडा बोचरे व त्यांचे सहकारी गणेश बोंबटकार विकास अधिकारी यांनी कोरोना जनजागृती बद्दल माहिती सांगितली त्यामध्ये त्यांनी स्वच्छते बद्दल माहिती दिली व रोजच्या आहारात जीवनसत्त्वे असणारा सकस आहार घ्यावा व घरातील लहान व बुद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी व covid-19 कोरोना बद्दल माहिती दिली यावेळी माजी सरपंच पुंडलिक भाऊ पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण धर्मे ग्राम विकास अधिकारी चौधरीसाहेब व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी हजर होते

Leave a Comment