अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव
अतिवृष्टी व अवकाळी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी प्रशासनाने व पीक विमा कंपन्यांनी पंचनामे हे व्यक्तिशः किंवा ग्राहक तक्रार क्रमांक किंवा अँप च्या माध्यमातून न करता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सॅटेलाईट सर्वे च्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करावेत,अशी मागणी पंचायत समिती सदस्य राहुल बोडखे यांनी प्रशासनाकडे केली आहे. सोयाबीन,मूग,उडीद आदी शेती पिकांचे नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणावर झाले आहे व नुकसानग्रस्त क्षेत्र हे खूप मोठं आहे ८० टक्क्यांच्यावर सर्व पिकांचे नुकसान झाले आहे.त्यातच अजूनही नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे झाले नाहीत .शेतकऱ्यांना रब्बीसाठी शेती तयार करायची आहे पंचनामे लवकर झाले नाही तर नुकसान भरपाई लवकर मिळणार नाही . त्यातच व्यक्तिशः किंवा तक्रारींच्या हिशेबाने पंचनामे करण्यास बराच वेळ निघून जाईल व शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होईल.अलीकडे सर्वच गोष्टी ऑनलाईन करण्याचा सपाट सरकारने लावला आहे .तेव्हा पंचनामे का जुन्या पद्धतीने व्हावेत . सॅटेलाईट च्या माध्यमातून पंचनामे केल्यास प्रशासनाचा वेळहि वाचेल व शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळेल. पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी ग्राहक क्रमांकावर किंवा ऍप च्या माध्यमातून तक्रारी करण्यास शेतकऱ्यांना सांगत आहेत अनेक शेतकऱ्यांना मोबाईल मधले कळत नाही ,ग्राहक क्रमांकावर संपर्क न होऊ शकणे ,काही बँकांनी परस्पर पीक विम्याची रक्कम कपात केली असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे पोलिसी क्रमांक नाहीत आदी कारणांमुळे शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये व त्याला नुकसानभरपाई मिळन्यासाठी विलंब होऊ नये म्हणून सरसकट सॅटेलाईट च्या माध्यमातून प्रशासनाने व पीक विमा कंपन्यांनी तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी राहुल बोडखे यांनी प्रशासनाकडे केली आहे .