स्काँलरशीप परीक्षेत शेगाव तालुक्यातून प्रथम, तर जिल्ह्यात 6 वा मेरीट चि.श्रीशांत भास्कर डोसे

 

विठ्ठल अवताडे शेगाव /बुलढाणा

वर्ग 8 वी पूर्व माध्यमिक स्कॉलरशिप २०२३ मध्ये घेतलेल्या परीक्षेत श्री संत गजानन महाराज इंग्लिश स्कूल शेगावचा विद्यार्थी, प्राथमिक शिक्षक श्री.भास्कर डोसे सरांचा मुलगा चि. श्रीशांत याने शहरी विभागातील गुणवत्ता यादीत जिल्ह्यातून 6 वा शेगाव तालुक्यातून 1 ला येण्याचा बहुमान मिळविला ,

त्याने जिद्दीने अभ्यास करून हे यश मिळविले आहे , सध्या असणाऱ्या वातावरातील बहुतांश विद्यार्थी यांनी त्याचा आदर्श घ्यावा असे म्हटले तर वावगे ठरणार नाही ,

कारण या वयात अश्या पद्धतीने अभ्यास करून जिद्द मनात ठेवली तर भविष्यात असे विद्यार्थी यशस्वी होतात , श्रीशांत ने आपल्या यशाचे श्रेय आईवडील, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व डिजायर कोचिंग क्लास खामगाव चे संचालक श्री विवेक दांडगे सर यांना दिले

Leave a Comment