स्टेट बँक साखर खेर्डा येथे होत आहे ग्राहकांची गैरसोय

सिं.राजा/प्रतिनिधी

पावसाळ्याचे दिवस सुरु असून शेतकरी पीक कर्जासाठी बँकेत दररोज येरझारा घालत असून साखरखेर्डा शाखेमध्ये ग्राहकांना योग्य ती वागणूक मिळत नसल्याने ग्राहकांची खूप धावपळ व ग्राहक खूप त्रस्त झाले आहेत याठिकाणी ग्राहकांना उन्हात उभे राहावे लागते त्या ठिकाणी बँकेने कसलीही सोय केलेली नाहीये. दि.04 सप्टेंबर रोजी दरेगाव शाखासंघटक मनसे राधेश्याम बंगाळे पाटील यांनी विचारपूस केली असता कर्मचारी बँकेतील कर्मचारी यांनी त्यांचे सोबत गैरवर्तणूक देऊन उडवा उडवी ची उत्तरे दिली तसेंच शेतकरी बांधव त्यांना सुद्धा योग्य ती वागणूक मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी देखील सांगितले आहे याठिकाणी ग्राहकांचे खूप हाल होताना दिसून आले असून बँकेत काउंटर सुद्धा कमी आहेत ते काउंटर चे प्रमाण देखील वाढले पाहिजे अशी ताकीद शाखा संघटक यांनी दिली तसेच योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची देखील काळजी घेतली गेली पाहिजे असे व्यवस्थापक यांना सांगून आज त्या कामाची दखल घ्यायला लावली येणाऱ्या काही दिवसात जर योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे राधेश्याम बंगाळे पाटील मनसे स्टाईलने आंदोलन असा इशारा देण्यात आला.

Leave a Comment