स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा ची कार्यवाही अवैध शस्त्र विक्री करीता बागडणाऱ्या इसमास केले जेरबंद 3 पिस्टल 12 जिवंत काडतुसे जप्त..

 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून अरविंद चावरिया पोलीस अधीक्षक बुलढाणा यांनी अवैध शस्त्रांवर कारवाई करणे कामी बळीराम गीते पोलीस निरीक्षक यांना आदेशित केले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेतील एक पथक तयार करण्यात आले होते दिनांक सहा जानेवारी रोजी सदरच्या पथकास गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की पचोरी बुऱ्हानपूर मध्य प्रदेश राज्यातील एक इसम जळगाव जामोद येथे येणार आहे अशी गुप्त माहिती दिली अशा प्राप्त माहितीवरून सदर पथकाने जळगाव जामोद परिसरातील बस स्थानक परिसरात सापळा लावला असता नमूद वर्णनाचा इसम बसस्थानक परिसरात मिळून आल्याने त्या इसमाला शिताफीने ताब्यात घेऊन पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात तीन देशी बनावटीचे पिस्टल सहा मॅग्झीन बारा जिवंत काडतुसे व एक मोबाईल विवो कंपनीचा फोन असा एकूण एक लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला सदर इसम हा स्वतःच्या राहत्या घरी गावठी पिस्टल बनवून विक्री करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून पुढील अधिकच्या तपासकामी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पीएसआय सचिन वाकडे यांच्या ताब्यात दिले आहे विशेष बाब म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मागील दोन महिन्यात शस्त्र अधिनियमाखाली सात कारवाया करून आठ तलवारी अकरा पिस्टल जप्त करून आठ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे सदरची कारवाई ही अरविंद चावरिया पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री हेमराज सिंग राजपूत अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव व बजरंग बनसोडे अप्पर पोलिस अधीक्षक बुलढाणा बळीराम गीते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक निलेश शेळके पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस अंमलदार गजानन आहेर संजय नागवे युवराज शिंदे सतीश जाधव संजय मिसाळ यांनी ही कारवाई पार पाडली आहे.

Leave a Comment