Home Breaking News स्वस्थ धान्य दुकानामध्ये सडक्या मक्याचे वितरण पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार …

स्वस्थ धान्य दुकानामध्ये सडक्या मक्याचे वितरण पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार …

507
0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील स्वस्त धान्य दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाच्या मक्याचे वितरण करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने विचारणा केली असता जळगाव जामोद येथील पुरवठा विभागाने शेगाव तालुक्यातून खरेदी करण्यात आलेल्याचे समजते.तसेच हा सडका मका गरिबांना वितरण करण्यात येत असुन या मक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिठ तसेच किटक,अळ्या मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच हा मका जर जनावरांना टाकला असता जनावरे सुध्दा ह्या दर्जाचा मका खात नाहीत परंतु जळगांव जामोद येथील पुरवठा विभाग हे सडके धान्य गोरगरिबांना खाण्यास देत आहे.तसेच राशन कार्ड धारक हा मका घेण्यास नकार देत आहेत. या मंक्यामुळे राशन कार्ड धारकांना विविध आजार होण्याची शक्यता जास्त आहे.या आजारांना कारणीभूत फक्त पुरवठा विभाग तसेच संबंधित तहसीलदार जबाबदार राहतील. हा सडक्या स्वरपाच्या मक्याची शेगाव येथून आयात केला आहे असे जळगांव जा.येथील पुरवठा अधिकारी सुर्यवंशी यांनी सांगितले. परंतु सदर मका शेगाव येथून जळगाव जामोद ला आला असताना त्याची पुरवठा विभाग कोणत्याच प्रकारची शहानिशा व पाहणी न करताच जळगाव जामोद तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना वितरित करण्यात येतो हे म्हणजे असे झाले की कान धरुन आणणे आणि शेपूट धरून हाकलून देणे अशा प्रकारचे जळगाव जामोद येथील पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार चालू आहे यावर जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांनी याकडे लक्ष देवुन संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी समस्त गोरगरीब राशन कार्ड धारक नागरिकांनी केली आहे.

Previous articleरविकांत तुपकरांनी केला मोताळा तालुक्याचा दौरा.. विविध ठिकाणी दिल्या भेटी..
Next articleस्कार्पिओ ची धडक दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार.. स्कार्पियो चालक फरार शेगाव खामगाव रोडवरील माऊली कॉलेज जवळ मध्यरात्रीची घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here