शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढण्यासाठी सज्ज राहा : रविकांत तुपकर
इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा, दि. ३ ( स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्षाची बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरील व घाटाखालील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक २ ऑगस्ट रोजी स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर, बुलढाणा येथे पार पडली.
या बैठकीत विविध विषयांवर पदाधिकऱ्यांनी आपली मते दिलखुलासपणे मांडली. तर जिल्हा पातळीवरील पक्ष आणि संघटनेच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन यावेळी रविकांत तुपकर यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
रविकांत तुपकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी संघटना व पक्षीय पातळीवरील काही नियुक्त्या जिल्हा कार्यकारिणीच्या मान्यतेने करण्यात आल्या. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (घाटावरील) जिल्हाध्यक्ष पदी डॉ. ज्ञानेश्वर टाले (मेहकर) व पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी बबनराव चेके (दे.राजा) व विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी पवनकुमार देशमुख (बुलढाणा) यांची फेरनिवड करण्यात आली.
तर अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी शेख जुल्फेकार (दे.राजा) यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष पदी अमोल राऊत (मलकापूर) यांची निवड करण्यात आली व युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अनंता मानकर (संग्रामपूर), अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी मासुम शहा (खामगाव) यांची फेरनिवड करण्यात आली.
तर पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी आनंदा आटोळे (खामगाव) यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदी श्याम अवथळे (खामगाव) यांची निवड करण्यात आली. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे रविकांत तुपकर यांनी अभिनंदन केले
तर उर्वरित सर्व नियुक्त्या येत्या आठवड्याभरात करणार असल्याचे रविकांत तुपकरांनी जाहीर केले. आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता या नियुक्त्या करण्यात आल्याअसून सर्वांनी जोमाने कामाला लागावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे ताकदीने काम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शेतकरी चळवळ आणि संघटना मजबूत होण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी शेतकरीपुत्रांना या चळवळीत सहभागी करुन घ्यावे. शेतकऱ्यांच्या हितासाठी संघटनेच्या माध्यमातून आपण २० वर्षांपासून लढा देत आहेत.
या संघर्षात सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तोलामोलाची साथ दिली असून आजही छातीचा कोट करुन कार्यकर्ते सोबत आहेत. यापुढेही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन यावेळी रविकांत तुपकर यांनी केले.