हजारो सेवेकरांनी घेतला पारायणाचा लाभ कारंजा लाड येथे श्री. परमहंस परशराम महाराज पारायन सोहळा संपन्न

 

अर्जुन कराळे शेगाव

अमरावती- श्री शेत्र कारंजा (लाड) येथे श्री नृसिंह स्वामी महाराज मंदिर (गुरु महाराज मंदिर) येथे श्री परमहंस परशराम महाराज पारायण सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. यावेळी श्री शेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे मुख्य पुजारी श्री सुनील महाराज पोपट हे आपल्या कुटुंबियांसमवेत सहभागी झाले होते.

सदर पारायण सोहळ्याला कारंजा (लाड) येथील आमदार राजेंद्र पाटणी व बुलढाणा येथील समाजभूषण विजयराज शिंदे त्यांनी सुद्धा पारायण सोहळ्याला भेट दिली असता त्यांचे हस्तैे श्री परमंहस परशराम महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आहे. तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक देविदासजी वाघमार यांनी सुध्दा उपस्थिती लावली.

या पारायण सोहळया पूवी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मुख्य मंदिरात एप्रिल महिन्यामध्ये रोजी मोठ्या भक्ती भावाने आपण श्री परशराम महाराजांच्या महिमा ग्रंथाचा पारायण सोहळा आयोजित केला होता. तो यशस्वी झाल्यानंतर श्री परशराम महाराज हे कारंजा (लाड) येथून जवळ असलेल्या इंझा (वनश्री) येथे २१ मार्च १९५१ ब्रह्मलिन झाले त्या अनुषंगाने तिथे कुठलेही आज पावतो पारायण झाले नव्हते

संदर्भात संकल्पना आल्यावर सर्व मुख्य सेवाधारी यांच्याशी संवाद करून मी जयंत सुरेशराव वानखडे यांच्यासह विलास जामठीकर, गोकुल शेगोकार, भालचंद्र कथलकर, राजू कथलकर, विलास दलाल, अशोक भारसाकळे, पुरुषोत्तमराव खंडार, महिमा ग्रंथ रचयते श्री. ढोले गुरुजी, श्री. डोरस गुरुजी, शंकरराव खवले, अमृतराव शेगोकार, महेंद्र कथलकर, चिन्मय जयंत वानखडे, हर्षवर्धन जामठीकर यांचे सह श्री क्षेत्र कारंजा (लाड) येथे श्री गुरू महाराज मंदिराचे विश्वस्त यांच्याशी बैठक घेतली व बैठक यशस्वी सुद्धा झाली त्यावेळी सर्व विश्वस्तांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करण्या करिता आश्वस्त केले.

त्यानंतर श्री शेत्र पिंपळोद येथे सेवाधारी अशोकराव भारसाकळे यांच्याकडे सर्व मुख्य सेवाधारी यांची बैठक बोलावून सर्वांना विस्तृत माहिती देण्यात आली व प्रत्येक सेवाधारी यांना सूचना विचारण्यात आल्या त्यांच्या सूचनांचे सुद्धा स्वागत करण्यात आले. यावेळी लाखोंडा, अकोला, अंर्तगांव (शिवाजी), पाटसूल (रेल्वे), अमरावती, खामगाव येथील सेवाधारी यांनी उपस्थिती दर्शविली. या पारायण सोहळयामध्ये वर्धा, अमरावती, शिरपूर (गुरव), सुकळी (गुरव), धानोरा (गुरव), जळतापूर त्याच प्रमाणे दर्याबाद, अंर्तरगाव (शिवाजी), अकोला जिल्हयातील पाटसूल (रेल्वे, खामगाव, बुलढाणा, मुंदेफळ, मेहकर, चिखली, अकोला, बार्शीटाकळी, खंडाळा, इंझा (वनश्री), लाखोंडा, पिंपळोद, आकोट, कारंजा (लाड), खंडाळा, वाशिम, मंगरूळपीर सर्व समाज बांधव भक्तगण या सर्वांची उपस्थिती लाभली.

यावेळेस विविध संस्थांचे समाज संघटनेचे अध्यक्ष यांची सुद्धा कार्यकारणी सह उपस्थिती होते. यामध्ये श्री शैव गुरव समाज हितकारणी मंडळ, अमरावती, अखिल गुरव समाज संघटना, बुलढाणा. गुरव समाज मंडळ, कारंजा (लाड).गुरव समाज हितकारणी मंडळ, खामगाव. श्री निळकंठेश्वर संस्थान, अमरावती. श्री हैनाही महाराज संस्थान, मुंदेफळ. श्री परमहंस परशराम महाराज संस्थान, जळतापूर. श्री परशराम महाराज संस्थान, शिरपूर (गुरव). श्री परशराम महाराज संस्थान सुकळी (गुरव) श्री परशराम महाराज संस्थान लाखोंना. श्री परशराम महाराज संस्थान, पिंपळोद. श्री परशराम महाराज संस्थान अंर्तगाव (शिवाजी) श्री परशराम महाराज संस्थान, जलकुंड पिंपळोद. श्री परशराम महाराज संस्थान, इंझा (वनश्री). व इतर स्मरणात असलेले व नसलेले यांची सुद्धा उपस्थिती होती.

श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज (गुरु महाराज) संस्थांचे सर्व विश्वस्त तसेच कारंजा (लाड) येथील समाज बांधवांनी कार्यक्रमाच्या दिवशी जो सेवाभाव दिला जयंत वानखडे यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले.

Leave a Comment