हिंगणघाट काँग्रेस कमिटी तर्फे भिडेच्या विधानाचा निषेध

 

प्रमोद जुमडे हिंगणघाट/वर्धा

आज दि. ३१ जुलै २०२३ ला हिंगणघाट शहर काँग्रेस कमिटी तर्फे संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध नोंदविण्यात आला.

संभाजी भिडे हा नेहमी थोर महापुरुष यांच्यक्बाबत आक्षेपार्ह विधान करून प्रकाश झोतात राहतो, स्वतंत्र लढ्यात मोलाची कामगिरी बजावलेले महान विभूतीबाबत संभाजी भिडे यांनी केलेले विधान म्हमजे स्वातंत्र्य करिता प्राणाची आहुती दिलेल्या समस्त थोर पुरुषांचा अपमान आहे.

त्यामुळे संभाजी भिडे यांचेवर त्वरित कार्यवाही करून त्यांना अटक करावी व त्यांचेवर खटला चालविण्यात यावा अशी मागणी काँग्रेस तर्फे मा मुख्यमंत्री यांना मा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून करण्यांत आली.

याप्रसंगी पंढरीभाऊ कापसे, शहर अध्यक्ष हिंगणघाट काँग्रेस, ज्वलत मून, सचिव प्रदेश काँग्रेस कमिटी, अ. जा. विभाग, नरेंद चाफले, जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया विभाग वर्धा जिल्हा, रागिणी शेंडे, उपाध्यक्ष, महिला काँग्रेस, वर्धा जिल्हा, गुणवंत कारवाटकर, सुनील हरबुडे, सुरेंद्र बोरकर, प्रमोद जुमडे, प्रशांत राऊत, संजय कांबळे, इकबाल पहेलवान, हुमायू बेग, रमेश ढाले, मंदाकिनी ढाले, सुनीता चंदनखेडे, सुनीता भोयर, इत्यादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment