हिंगणघाट केसरी कुस्ती स्पर्धा 2022 चे भव्य आयोजन

प्रतिनिधि सचिन वाघे

हिंगनघट :- लालाजी आखाडा व स्वराज्य फाउंडेशन द्वारा आयोजित स्व. तुकारामजी धोटे तसेच स्व. अंबादासजी गावंडे स्मृती प्रित्यर्थ हिंगणघाट केसरी कुस्ती स्पर्धा 2022 चा आयोजन २७/२८ डिसेंबर ला स्थळ लालाजी आखाडा मैदान मासाहेब जिजाऊ चौक निशानपुरा वॉर्ड हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे करण्यात आले आहे.

हिंगणघाट केसरी कुस्ती स्पर्धा नियोजन समितीचे अध्यक्ष अमितजी गावंडे यांच्याकडून सर्व खेळाडूंना आवाहन करण्यात येत आहे की स्पर्धकांनी या हिंगणघाट केसरी कुस्ती स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच क्रीडा प्रेमींनी देखील या कार्यक्रमात उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहित करावे.

कुस्ती स्पर्धा ही वजन गटातली असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व ट्रॉफी देण्यात येईल. व खुल्या गटातील विजेत्या स्पर्धकाला चांदीची मानाची गदा(मा.सुधिर कोठारी, सभापती,कृ.उ.बा.स.,हिं.)यांच्या कडून देण्यात येईल.

Leave a Comment