हिंगणघाट नगरपरिषदेने मोकाट जनावरांसाठी केली कोंडवाडाची व्यवस्था

 

हिंगणघाट :- गणेशोत्सवाच्या व पावसाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या मोकाट जनावरांसाठी नगर परिषदेकडुन कोंडवाड्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कामासाठी नगर परिषदेकडुन सर्व प्रथम शहरामध्ये नागरीकांना नाउसस्पिकर द्वारे सुचना पुढील प्रमाणे देण्यात आली. मुख्य मार्गावरील रहदारीच्या ठिकाणी असलेले मोकाट जनावरे ज्या कोणत्या नागरीकांचे आहे त्यांची आपल्या घरी किंवा आवश्यक त्या ठिकाणी आपले जनावरे बांधून ठेवण्यात यावी. मोकाट जनावरे रहदारीच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर आढळल्यास आपली जनावरे कोंडवाडयामध्ये जमा करण्यात येईल व जनावर मालकांवर एक मोठा जनावरांसाठी २०००/- प्रति जनावर लहान वासरांसाठी २०००/- प्रति नुसार दंड आकारण्यात येणार अशा

प्रकारच्या सुचना देण्यात आल्या. या कामासाठी नगर परिषदेने १५ पेक्षा जास्त कर्मचान्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच नगर परिषदेला पाकामासाठी कोणत्याही नागरीकांनी प्रास देत असल्यास पोलिस निरिक्षक, पोलिस स्टेशन, हिंगणघाट यांनी १२ या नंबर वर संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच याकामामध्ये कोणीही अडथळा निर्माण केल्यास नियमानुसार कारवाई करण्याचा ईशारा पोलिस प्रशासनाकडून सुद्धा देण्यात आलेला आहे.

त्यामुळे याद्वारे हिंगणघाट शहरातील नागरीकांना आवाहन करण्यात येते आपले जनावरे रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी मोडू नये आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल व जनावरे कोंडवाडयात जमा करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन सुध्दा याद्वारे करण्यात येत आहे.

Leave a Comment