हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे बनावट उत्पन्नाचे प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

 

हिंगणघाट :- दि. 3 ऑक्टोंबर ला अर्जुन पवार (नायब तहसीलदार) यांनी केलेल्या तक्रारीवरून श्री. भारत नथ्थुजी महाकाळकर रा. हिंगणघाट यांचा मुलगा आदीत्य नारायण महाकाळकर यांनी दि. 19/09/2022 रोजी नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र मिळणेकरीता ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे. सदर अर्जाची पडताडणी दि 27/09/2022 रोजी या कार्यालयाव्दारे करतांना अर्जदाराने अर्जासोबत सादर केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र क्र 40214455131 ची पडताडणी www.mahaonline.gov.in या संगणकीय स्थळावर केली असता सादर केलेल्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्रावरील बारकोड हा पुरुषोत्तम बळीराम बुचके या व्यक्तीच्या नावे असून त्या व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. त्यामुळे अर्जदाराने सादर केलेले प्रमाणपत्र हे बनावटी असल्याने कलम 465, 468, 471 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद केला. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

सोमनाथ टापरे (पोलीस उपनिरीक्षक तपास अधिकारी ) :- प्रतिनिधी यांनी माहिती घेतली असता सध्या पोलीस बंदोबस्त मध्ये व्यस्त आहे . ज्या ग्रामदूत मध्ये ऑनलाईन उत्पन्न काढले त्या ग्रामदूत वर सुद्धा कारवाई करून गुन्हा दाखल करू

Leave a Comment