हिशोब घेणारे नगरसेवक निवडून आले तर योग्य अंमलबजावणी होईल नाहीतर भ्रष्टाचारच दिसेल

 

हिंगणघाट शहरात अमृत योजनेअंतर्गत कामे हे 2019 ला पूर्ण करणे आवश्यक होते परंतु सत्ताधारी यांनी आपले कर्तव्य व विरोधी पक्ष यांनी आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडली नाही त्यामुळे हिंगणघाट शहराला पाण्याची समस्या राहील (त्याला जबाबदार आम्हीच आहो) आजही हिंगणघाट शहरात अनेक योजनेतून अर्धवट कामे नियमाच्या आत झाले नाही व ते बाकी आहे .कामे अर्धवट राहिल्यामुळे पुन्हा यावर वाढीव रक्कम बिल काढेल व हे सर्व पैसे जनतेच्या कराच्या माध्यमातून वसूल करण्यात येणार आहे अमृत योजनेतील कामे हे नियमाच्या आत झाले का ?
सत्ताधारी व विरोधक यांनी याबद्दल जनतेला सांगितले का ? केंद्र शासन पुरस्कृत अमृत पाणी पुरवठा योजनेअंतर्गत हिंगणघाट नागरी पाणी पुरवठा योजना
प्रशासकीय मंजुरी (16/5/2016 )
:- 61 कोटी 58 लाख 60 हजार 88 रुपये
करारनामा दि.12/4/17 ते 12/4/19 (24 महिने )
ठेकेदाराचे नाव :- संतोष कंट्रक्शन अँड इन्फ्रा नांदेड
अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

Leave a Comment