Home Breaking News हॉटेलमध्ये गळफास घेऊन तरुण इंजिनिअरची आत्महत्या

हॉटेलमध्ये गळफास घेऊन तरुण इंजिनिअरची आत्महत्या

551
0

 

(सूर्या मराठी न्युज) पुणे: ही घटना दुर्दवि असून हा तरुण मोठा स्वप्न घेउन दिल्लीतून पुण्यात आलेल्या एका इंजिनिअर तरुणाने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. असून ही आत्महत्येचे कारण अद्याप ही समजू शकलेले नाही.

जितेंद्रकुमार गुप्ता (वय २९, रा. नवी दिल्ली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुप्ता नोएडातील एका खासगी कंपनीत नोकरीस होते. ते दिल्लीतील राहत्या घरातून बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार तेथे पोलीसाना दिली होती. दिल्लीतून निघालेले गुप्ता मॉडेल कॉलनीत असलेल्या एका हॉटेलमध्ये राहायला आले.
रविवारी (२२ नोव्हेंबर) त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. गुप्ता यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिलेली नव्हती. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांनी नैराश्यातून ही आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी व्यक्त केली. असून पुढील तपास सुरू आहे

Previous articleभारतीय जनता युवा मोर्चाच्या सेलू तालुका अध्यक्ष श्री.शिवहरी शेवाळे पाटील यांची नियुक्ती
Next articleविज बिलाची सक्तीची वसुली कराल तर स्वाभिमानी स्वस्त बसणार नाही. : गोपाल तायडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here