१५८ मुलांना केले पालकांच्या स्वाधीन .केशवस्मूर्ति प्रतिष्ठान समतोल प्रकल्पाची कामगिरी.

 

बुलडाणा :- पंकज थिगळे

जळगाव : केशवस्मूर्ती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या १ जानेवारी २०२२ ते ३० जून २०२२ या सहा महिन्यांच्या कालावधीत १५८ मुलांना वाचवण्यात यश आले आहे . मध्य रेल्वे अंतर्गत जळगाव रेल्वे स्टेशन, प्लॅट फोमवरील १५८ मुलांची सुटका केली आहे .या मध्ये १२७ मुले आणि 31 मुलींचा समावेश आहे .त्यांना समतोल प्रकल्पाच्या मदतीने पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे . भांडणामुळे , कौटुंबिक समस्यांमुळे , रागाने , संतापाने , शहराच्या आकर्षणाने, बालभिकारी, भंगार वेचणारी मुल , नश्या करणारी मुल , व्यसन वा गुन्हेगारीकडे वळू पाहणारी मुल किंवा वेगवेगळ्या कारणांनी कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले , समतोल प्रकल्पाची टीम रेल्वे स्टेशनवर आउटरिच करीत असते , त्या दरम्यान प्रशिक्षित मुले समतोल कर्मचाऱ्यांना आढळतात .हे टीम त्या मुलांशी जवळीक साधतात , त्यांच्या समस्या समजून घेतात. आणि त्यांना त्यांच्या पालकांकडे परत जाण्याचा सल्ला देतात . रेल्वे प्रशासन रेल्वे पोलीस , जीआरपी , जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी बाल कल्याण समिती , बालगृह जिल्हा सामान्य रुग्णालय वैदयकीय अधिकारी प्रशासन यंत्रणा आदींचे सहकार्य समतोल च्या कार्याला होत आहे . मुले पालकांच्या स्वाधीन केल्याचा वेगळाच आनंद मिळतो , अशी प्रतिक्रिया समतोल प्रकल्पाचे प्रदिप पाटील , व विश्वजीत सपकाळे यांनी दिली .

Leave a Comment