सिंदि रेल्वे घर टॅक्स वाढ व कायमस्वरूपी मुख्याधिकारी प्रकरणात प्रशासनाने जी आश्वासने दिली ती पूर्ण न झाल्याने
;- सिंदी (रेल्वे) शहरांतील नगर पालिकेने घर करामध्ये अवाजवी कर वाढवलेला आहे. तो कर रद्द करण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह सिंदी रेल्वे येथील सर्व पक्षीय नेते, जनसामान्य नागरिकांनी न. पा. मुख्याधिकारी यांना वारंवार निवेदने दिली.
नगरपालिकेवर भर पावसात मोठ्या प्रमाणात जन आक्रोश मोर्चा सुद्धा काढला असता या मोर्चात मोठ्या प्रमाणात शहरातील अनेक राजकीय पक्ष, विविध संघटना व सामान्य नागरिकांनसह रस्त्यावर उतरून नगर पालिका प्रशासनाला कर टॅक्स वाढ प्रकरणात जॉब विचारला असता मुख्याधिकार्यानी १५ ऑगस्ट पर्यंत टॅक्स कर वाढ कमी करून देऊ अशे सर्वांसमोर आश्वासन दिले परंतु आज अस लक्षात येते की प्रशासनाने सिंदी रेल्वे वासियानकडे पाठ फिरवली.
तसेच *कायमस्वरुपी मुख्याधिकारी नगर पालिकेला मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांचाशी खासदार रामदास तडस, विधानसभा आमदार रामदास आंबटकर, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले तसेच सिंदी शहरातील प्रतिष्ठीत नागरिक यांनी जिल्हाधिकाऱ्याशी त्यांचा दालनात चर्चा केली असता या चर्चेतून १५ दिवसामध्ये नगर पालिकेला मुख्याधिकारी मिळणार अशे आश्वासन देण्यात आले परंतु आता महिना होत आहे नाही मालमत्ता कर ही कमी झाला नाही
मुख्याधिकारी सुद्धा नगर परिषद ला मिळाले नाही अशे पोकळ आश्वासन देऊन सिंदी रेल्वे शहर वासी यांची दिशाभूल प्रशासनाकडून होत आहे.* करीता येणाऱ्या १५ तारखेच्या आत जर घर टॅक्स (कर) कमी झाला नाही तसेच कायमस्वरुपी मुख्याधिकारी न. पा. येथे रजू झाला नाही तर *दि २२- ऑगस्ट रोज मंगळवार ला सिंदी रेल्वे येथे सिंदी शहरातील नागरिकांसह चक्का जाम आंदोलन करणार असा इशारा प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला आहे.*