सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
आडगावराजा येथे दरवर्षी प्रमाणे याहिवर्षी १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या दरम्यान श्रामणेर शिबीराचे आयोजन मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने भदन्त गुणरत्नजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे . या दरम्यान ६ फेब्रुवारी २०२१ शनिवारी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायीका आशा चरवे
यांचा भिम गितांचा संगितमय कार्यक्रम राञी ८ ते ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे त्याचबरोबर !! सुप्रसिद्ध गायीका आशा चरवे यांनी कुटुंबासह धम्म दिक्षा घेतल्या मुळे त्यांचा बौद्ध बांधवाच्या वतिने जाहिर सत्कार करण्यात येणार आहे !! तरी या कार्यक्रमासाठी परीसरातील ऊपासाक उपासीकांनी हजर रहावे असे आवाहन आडगावराजा येथील माजी श्रामणेर संघ व बौद्ध ऊपासक ऊपासीकांनी केले आहे !