Home Breaking News 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

0
2495

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद 15 वर्षीय मुलीवर चार तरुणांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड खुर्द येथे 18 सप्टेंबर ला रात्री घडली. जळगाव जामोद पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आज, 19 सप्टेंबरला पहाटे साडेपाचलाच तीन तरुणांना अटक केली आहे. एक जण फरारी असून, त्याचा शोध घेतला जात आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले, की मडाखेड खुर्द येथील 15 वर्षीय मुलगी शौचासाठी काल रात्री आठच्या सुमारास गावाबाहेर गेली होती. तिच्यावर पाळत ठेवून सागर मांडोकर, टिल्या उर्फ प्रवीण इंद्रभान भिलंगे (22), संदीप वसंत जवंजाळ (27), ज्ञानेश्‍वर प्रभाकर शित्रे (35, सर्व रा. मडाखेड खुर्द) या चौघांनी तिला गाठले. ज्ञानेश्‍वरने तिच्या तोंडावर कापड टाकून तोंड दाबले. चौघांनी मिळून तिला मरीमातेच्या मंदिराकडे ओढत नेले. तेथे तिला झोपवून ज्ञानेश्‍वरने सागर, टिल्या यांना तुम्ही काय करायचे ते करा, मी तिचे तोंड दाबले आहे असे म्हणून तोंड दाबून धरले. टिल्याने तिचे हात पकडले. सागरने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर सागरने हात पकडून टिल्याने बलात्कार केला. संदीप जवंजाळ याने कोणी येत तर नाही ना, याकडे लक्ष ठेवले. बलात्कार केल्यानंतर ज्ञानेश्‍वरने तिला तू जर घरच्यांना सांगितले तर तुला मारू, अशी धमकी दिली व तेथून पळून गेले. मुलीने घरी येताच टाहो फोडल्याने घरच्यांनी तिला विश्‍वासात घेऊन विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यावरून तिच्या चुलत भावासह जळगाव जामोद पोलीस ठाण्यात येत तिने तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. टिल्या, संदीप, ज्ञानेश्‍वरला आज पहाटेच त्यांच्या घरातून अटक केली. सागर फरारी असून, त्याचा शोध घेतला जात आहे. तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश वळवी, पोलीस कॉन्स्टेबल विकास गव्हाड, पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील, पोलीस कॉस्टेबल सचिन राजपूत करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here