SURYA MARATHI NEWS
पुणे : -सासरच्या लोकांनी मुलामध्ये लैंगिक कमतरता असल्याचे लपवून ठेवत महिलेचा शारिरीक, मानसिक, भावनिक आणि लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. तर हा प्रकार जून 2021 ते नोव्हेंबर 2021पर्यंत या कालावधीत घडला असून ही अहमदनगर जिल्ह्यातील अकोले (Akole Ahmednagar District) येथे घडला आहे. तर याप्रकरणी पुण्यातील उच्चभ्रू परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीच्या पीडित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar police station) फिर्याद दिली आहे. की
हडपसर पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पती, सासरे, सासू आणि एका महिलेवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सासरच्या लोकांनी पीडित महिलेच्या पतीमध्ये लैंगिक कमतरता असल्याची माहिती लपवून ठेवून वेळोवेळी शाररिक, मानसिक छळ केला. तसेच सासूकडे ठेवण्यासाठी दिलेल्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणूक केली. आहे तरी या
पीडित महिला मोबाईल घेण्यासाठी गेल्या असता आरोपी सासऱ्यांनी त्यांचा विनयभंग केला.व तसेच फिर्यादी आणि त्यांच्या आई-वडिलांना घरात डांबून ठेऊन शिवीगाळ करत दमदाटी केली, व असे फिर्यादीत म्हटले आहे.की फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन चार जणांवर गुन्हा (molestation case) दाखल केला आहे. व पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.
Surya marathi news