Home बुलढाणा 26 जानेवारीला शिक्षण उपसंचालक अमरावती कार्यालयासमोर अन्यायग्रस्त शिक्षक गजानन खंडारे यांचे अमरण...

26 जानेवारीला शिक्षण उपसंचालक अमरावती कार्यालयासमोर अन्यायग्रस्त शिक्षक गजानन खंडारे यांचे अमरण उपोषण !

396
0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक व स्वर्गीय भास्करराव शिंगणे उच्च माध्यमिक विद्यालयातील घोटाळ्याची चौकशी करावी या मागणीसाठी राजेगाव येथील शिक्षक गजानन खंडारे यांनी अमरावतीच्या शिक्षण उपसंचालक यांच्याकडे रीतसर तक्रार अर्ज दिला होता ‘तशी ते 30 डिसेंबरपासून उपोषण सुद्धा करणार होते परंतु कोरोना च्या पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी त्यांना पत्र पाठवतो असे सांगून उपोषणाला बसू नका असे सांगितले !त्यावर श्री गजानन खंडारे यांनी विश्वास ठेवला व उपोषण मागे घेतले परंतु !शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी पत्र क्र . एचएस सी / ६१६७ / २० २० त्या पत्रामध्ये शाळेतील कुठल्याही प्रकारची गैरव्यवहाराची चौकशी अथवा समिती नेमून कारवाई करू असे आश्वासन देण्यात आले नाही !त्यामुळे निराश होऊन परत शिक्षक गजानन खंडारे यांनी अमरावती शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर 26 जानेवारीपासून बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेततेरा वर्ष न्यायालयीन लढा व न्यायालयाच्या समजू त्यानंतरही संस्थाचालक आपल्याला शाळेवर घेत नाही तसेच अमरावती शिक्षण विभागातील तसेच कार्यालयातील कारकून सुद्धा दिशाभूल करून आपल्याला न्यायापासून प्रवृत्त करत आहे असेही श्री गजानन खंडारे यांनी म्हटले आहे !26 जानेवारी पासून अपल शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू करणार आहे मरण पत्करेल पण आता माघार घेणार नाही असा निर्धार यावेळी श्री खंडारे यांनी व्यक्त केला आहे !

Previous articleहिवाळी परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्या यासाठी फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे जीवन चेके यांचे अमरावती कुलगुरूंना निवेदन !
Next articleराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये चित्रकला व निबंध स्पर्धा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here