अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.
Foreshtnews/अकोट:-अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील प्रकरणासंदर्भात गैर अर्जदार यांच्या विरोधात फिर्यादीने पोलिस स्टेशन अकोट येथे कारवाई करण्याबाबत तक्रार दाखल केली आहे.प्रकरण असे आहे की,
फिर्यादी सोमंत वसंतराव रजाने वय ३५ वर्ष,धंदा- शेती रा.बोर्डी, ता. अकोट, जि. अकोला व गैरअर्जदार नम्रता टाले,सहाय्यक वनसंरक्षक (वने) अकोला वनविभाग अकोला व इतर संबंधीत वनअधिकारी गैरअर्जदाराच्या विरुध्द गुन्ह्याची नोंद करुन कायदेशिर कार्यवाही करणेबाबत लेखी तक्रारीच्या व्दारे मागणी केली आहे.policenews
त्याचप्रमाणे मला व माझ्या कुटुंबाला पोलिस सरंक्षण मिळण्याबाबत सुद्धा फिर्यादी यांनी मागणी केली आहे.
प्रकरण असे आहे की दिनांक ०६.१२.२०२० रोजी सोपान गणेश रेळे याची दु-व्हिलर बाईक स्लिप झाल्यामुळे त्याचा अपघात झाला होता. त्याला मी ग्रामीण शासकीय रुग्णालय अकोट येथे उपचारा करीता नेले होते.
आवक पोलीस लिपीकर बयान नोंदविण्याकरीता दोन कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या. तसेच संबंधीत वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावने यांनी सदरच्या घटने संबंधी अधीनपरीक्षेत्र अधिकारी थोरात यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये माझे बयाण नोंदवून माझी सही सुध्दा घेतली होती.परंतु जेव्हा मी ते बयाण वाचले असता ते खोटे व चुकीचे दिसले होते. कारण घटना ही मोटार अपघाताची असतांना माझे बयाण हे वनप्राणी हल्ला प्रकरणा संबंधी नोंदविले होते.
म्हणून मी माझे बयाण परत मागितली होते. परंतु दिनांक 3/7/2025 प्रेषक लिपीक जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांनी सदरहू बयाण परत देता येत नाही असे म्हटले होते व सदरहू बयाण आम्ही रेकॉर्डला लावणार नाही असे सुध्दा त्यांनी म्हटले होते.
जेव्हा मला वर्तमान पत्राव्दारे माहिती पडले होते की, सोपान गणेश रेळे चे वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाईचे प्रकरण मंजूर झाले आहे. तेव्हा माझ्या बयाणाचा वन विभागांने दुरुपयोग केला असे मला वाटले म्हणून मी वनपरीक्षेत्र अधिकारी यांना माझे बयाण परत करण्याची फोनव्दारे विनंती केली तेव्हा त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात येण्याचे सांगितले होते. मी व माझ्यासोबत शेख मुन्ना आम्ही दिनांक २२.०६.२०२५ रोजी वनपरीक्षेत्र अधिकारी अकोला यांच्या कार्यालयात गेलो असता दिसून आले नाही.
त्यांना वारंवार फोन सुध्दा लावण्यात आले होते.परंतु त्यांनी माझा फोन नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकल्याचे लक्षात आले. शेवटी मी हताश होवून कोर्टाच्या रोडच्या बाजुने असलेल्या कॅटीनवर चहा पित असतांना तेथे अॅड. एस.जी. खंडारे यांच्याशी ओळख झाली व त्यांना सदरच्या प्रकरणाची संपूर्ण माहिती सांगितली तेका त्यांनी असे म्हटले होते की तुम्हाला खोट्या प्रकरणात अडकविण्याची शक्यता आहे.
Foreshtnews/करीता माझा कसले प्रकारचा दोष नसताना मला दोषी ठरवणे हे कितपत योग्य आहे?म्हणून सदर प्रकरणात आपण योग्य ती चौकशी करून मला न्याय द्यावा व गैर अर्जदारांवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी आणि माझ्या कुटुंबाला संरक्षण द्यावा अशी विनंती फिर्यादी आणि केली आहे.