Buldhana/संग्रामपूर तालुका शिवसेना किसान सेनेच्या तालुका प्रमुख पदी अमोल ठाकरे यांची नियुक्ती

 

उद्धवजी साहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या सूचनेवरून व नरेंद्रजी खेडेकर संपर्क नेते, जिल्हाप्रमुख बुलढाणा यांच्या आदेशावरून तसेच दत्तात्रय पाटील सहसंपर्क प्रमुख बुलडाणा ,वसंतराव भोजने शिवसेना जिल्हा प्रमुख बुलढाणा यांनी एका नियुक्तीपत्राद्वारे किसान सेना तालुकाप्रमुख पदी अमोल विश्वासराव ठाकरे यांची नियुक्ती केली आहे

१९सप्टेंबर रोजी संग्रामपूर येथे
तालुका बैठक व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी या कार्यक्रमात उपस्थित असलेले नरेंद्रजी खेडेकर संपर्क नेते जिल्हाप्रमुख बुलढाणा, दत्तात्रय पाटील सह संपर्कप्रमुख, वसंतराव भोजने शिवसेना जिल्हाप्रमुख , छगनराव मेहत्रे सहसंपर्कप्रमुख ,शुभम दत्तात्रय पाटील युवा सेना जिल्हाप्रमुख, रवींद्र झाडोकार तालुकाप्रमुख यांनी अमोल ठाकरे यांना सदरचे नियुक्तीपत्र दिले यावेळी शुभम घाटे शहर प्रमुख ,कैलास कडाळे उपतालुका प्रमुख ,राहुल मेटांगे, विजय मारोडे ,धनंजय अवचार, नितीन भिसे, शिवाजी अढाव तसेच तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमोल ठाकरे यांचा तालुक्यामध्ये चांगला जनसंपर्क असून ते नेहमी सामाजिक, तसेच धार्मिक चळवळीमध्ये अग्रेसर असल्यामुळे तसेच त्यांचा मनमिळावू स्वभाव असल्याने पक्षश्रेष्ठींनी सर्वांगीण विचार करून अमोल ठाकरे यांची नियुक्ती करून त्यांना शिवसेनेत काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या मित्र परिवारातून तसेच पक्षातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Comment