Gopinath munde गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलेला संघर्ष कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा आहे,भाजपाचे ज्ञानेश्वर शेजुळ यांनी व्यक्त केली भावना

 

Jalna (तुकाराम राठोड)

जालना-महाराष्ट्राचे मा.उपमुख्यमंत्री,संघर्षयौद्धा,लोकनेते,स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांनी सर्वसामान्य जनतेसाठी व भारतीय जनता पार्टीसाठी जिवनभर केलेला सघर्ष.

आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देणारा असल्याचे गौरवोद्गार भाजपाचे जालना जिल्हाउपाध्यक्ष,ज्ञानेश्वर शेजुळ यांनी स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जयंती निमित्त उदगार काढले आहे.लोकनेते स्व.मुंडे साहेबांची आज जालना तालुक्यातील सोनदेव येथे स्व.मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे पुजन करुन जयंती साजरी करण्यात आली.

त्याप्रसंगी ज्ञानेश्वर शेजुळ बोलत होते,यावेळी बोलताना श्री ज्ञानेश्वर शेजुळ म्हणाले की स्व.मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील गोरगरिब,दिनदुबळे,वंचित,वाड्यावस्त्यांवर राहणार्‍या सर्वसामान्य जनतेसाठी व शेतकर्‍यांसाठी अहोरात्र केलेला.

संघर्ष महाराष्ट्रातील जनता कदापी विसरणार नाही.उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात स्व.मुंडे साहेबांच्या नियोजनबद्ध कारभारामुळे राज्यात मुठेही जातीय दंगल अथवा मुंबईत बाँंबस्फोट झाले नाहीत.साहेबांच्या कार्यकाळात राज्यात शांतता प्रस्थापित झाली होती.यांची आठवण सुद्धा शेजुळ यांनी यावेळी करुन दिली.

सन २०१४ साली देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाखाली केंद्रिय मंत्रिमंडळात ग्रामविकासमंत्री म्हणुन स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांना संधी मिळाली.

परंतु स्व. मुंडे साहेबांचे अकाली निधन झाल्याने मुंडे साहेबांचे ग्रामविकासाचे स्वप्न अर्धवट राहील्याचे भाजपाचे जालना जिल्हाउपाध्यक्ष,ज्ञानेश्वर शेजुळ यांनी शेवटी सांगीतले.

यावेळी,परमेश्वर सोळुंके,रामदास ढाकणे,गणेश शेजुळ,मधुकर सोळुंके,रामदास पालवे,ज्ञानदेव ढाकणे,बद्रिनाथ ढाकणे,विष्णु मुंढे,बद्रिनाथ ढाकणे,बालासाहेब ढाकणे,राजेंद्र ढाकणे,रमेश मुंढे,विलास मुंढे,श्री कारभारी आंधळे,भास्कर ढाकणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Gopinath munde

Leave a Comment