Home Breaking News अनोळखी व्यक्ती बुरकुणी शिवारात शेतात मृत अवस्थेत

अनोळखी व्यक्ती बुरकुणी शिवारात शेतात मृत अवस्थेत

511

 

हिंगणघाट गणपत हिरामण चापले रा.बुरकुणी यांनी आज 15 ऑगस्टला पोलीस स्टेशनला माहिती दिली की बुरकुणी शिवारातील शेतात एक अनोळखी अंदाजे 60 ते 65 वर्षे पुरुषाचा मृत अवस्थेत पडून आहे. त्यावरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे मर्ग. क्र. 80/ 2021 कलम 174 नोंद करून सदर अनोळखी मृतक इसमाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला परंतु ओळख पटली नाही . मृतकाचे प्रेत सध्या उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील
शवविच्छेदन शीतगृहात ठेवण्यात आले आहे . याचे वर्णन उंची 05 फूट 07 इंच रंग सावळा बांधा सडपातळ अंगात पांढुरक्या रंगाचे त्यावर पिवळसर उभ्या रेषा असलेले शर्ट व पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला असून त्याच्याजवळ एक पिवळसर रंगाची तंबाखू चुन्याची प्लास्टिक डब्बी मिळून आली सदर अनोळखी मृतकांची ओळख पटल्यास हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक वसंत शुक्ला यांच्याशी संपर्क करावा . मोबाईल क्र.9765864264 , हिंगणघाट पोलीस स्टेशन नं.07153 – 244033
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

Previous articleबेवारस जखमी उंटाला मिळवुन दिला हक्काचा निवारा ; निसर्ग साथी फाऊंडेशन हिंगणघाट चा पुढाकार
Next articleस्वातंत्र्याच्या ७५ व्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या विविध घोषणा ; ७५ वंदे भारत ट्रेन, देशाच्या विकासासाठी १०० लाख कोटींची गतीशक्ती योजना; महिलांसाठी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म योजना ; २०२४ पर्यंत रेशन दुकानांवर पौष्टिकतांदूळ ; नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनची स्थापना ; मुलींसाठी सैनिकी शाळा खुल्या — मोहन चौकेकर