Home वर्धा आमदार समिर कुणावार यांची मातोश्री स्व. आशाताई कुणावार अभ्यासिकेस सदिच्छा भेट

आमदार समिर कुणावार यांची मातोश्री स्व. आशाताई कुणावार अभ्यासिकेस सदिच्छा भेट

200

 

हिंगणघाट
दि.१६ आगस्ट २०२१

शहरातील मातोश्री आशाताई कुणावार अभ्यासिका येथे विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांनी आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी भेट देऊन पाहणी केली.
अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना काही समस्या किंवा अडचणी असल्यास त्यांनी कोणत्याही क्षणी संपर्क करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी हिंगणघाट तालुक्याच्या नव्यानेच रूजू झालेल्या उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोणाले, तहसीलदार श्रीराम मुंदड़ा इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
नुकत्याच २१ फेब्रूवारी रोजी स्व.आशाताई कुणावार यांचे स्मृतीपर या अभ्यासिकेचे स्थानिक यादगार व्यायाम शाळेच्या परिसरात निर्मित समाज भवनात सुरु करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले होते. शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील गरीब,होतकरु विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगामार्फत किंवा शासनाचेवतीने शासकीय, निमशासकीय नौकऱ्यांसाठी स्पर्धा परीक्षा तसेच इतर नोकऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षाची तयारी करण्यासाठी,त्याचा अभ्यास करण्यासाठी विनामूल्य पुस्तके तसेच शांततामय परिसर उपलब्ध व्हावा,असा आ.समीर कुणावार यांचा हेतु होता,या हेतुने प्रेरित होऊन त्यांनी पुढाकार घेऊन या अभ्यासिकेची निर्मिती केली होती,अवघ्या सहा महिन्याचे कालावधीतच या अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करीत शासकीय नौकरीत प्रवेशसुद्धा मिळविला . आमदार समीर कुणावार, श्री. सुनिल फुटाणे सर, अ‍ॅड. सुशील नायडू सर व इतर मान्यवरांच्या सदिच्छा भेटीप्रसंगी दिसुन आले.
आज सदिच्छा भेटीदरम्यान उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले ,तहसीलदार श्रीराम मुंदड़ा यांनी अभ्यासिकेतील उपस्थित विद्यार्थ्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले.
आमदार समीर कुणावार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सूर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

Previous articleशास्त्री वार्ड येथे 75 वा स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
Next articleनिशाणपुरा वार्ड येथील कब्रस्थान परिसरात 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे पर्वावर वृक्षारोपण कार्यक्रम