यावल प्रतिनिधी विकी वानखेडे
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, यावल तालक्यातील चिंचोली गावातील गणेश शिवाजी पाटील या तरूणाकडे गावठी पिस्तुल असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण खात्याच्या पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी पोहेकॉ शरद वसंतरावभालेराव, महेश महाजन, किरण मोहन धनगर आणि प्रमोद अरुण लाडवंजारी यांचे पथक तयार केले.
या पथकाने चिंचोली तालुका यावल येथे जाऊन गणेश शिवाजी पाटील (वय२१, रा. रामानंद नगर, चिंचोली, तालुका यावल) याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तुल आढळून आले. हे पिस्तुल जप्त करण्यात आले असून गणेश पाटील याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरूध्द आर्म ऍक्टसह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.