Home Breaking News हिंगणघाट शहरात दुसरी घटना वाढदिवसाचा केक तलवारीने कापला

हिंगणघाट शहरात दुसरी घटना वाढदिवसाचा केक तलवारीने कापला

740

 

शहरात गुण्डागर्दीच्या घटनांमधे सतत वाढ होतांना दिसत असून तरुण युवकांनासुद्धा याचेच आकर्षण दिसुन येत आहे.
येथील तरुणतरुनींमधे सामुहिकरित्या हॉटेल,बगीचा अशा ठिकाणी शक्तिप्रदर्शन करीत वाढदिवस साजरा करणे आता नेहमीचा प्रकार झाला आहे.
नुकत्याच १२ रोजी स्थानिक गोमाजी वार्ड येथे एका युवकाने तलवारबाजी करीत वाढदिवस साजरा केला व त्याचा वीडियो सोशल मिडियावरती वायरल केला,या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केल्यानंतर दि.१५ रोजी स्थानिक गुरुनानक वार्ड येथे पुन्हा असाच प्रकार घडला.
गुरुनानक वार्ड येथील रहिवासी असलेल्या विक्की मोतीराम तख्तानी(२७) या तरुणाने रात्री १२ वाजताचे दरम्यान तलवारबाजी करीत त्या नग्न तलवारिनेच आपल्या जन्मदिवसाचा केक कापला.
यावेळी सार्वजनिक ठिकाणी मोठा जल्लोष करण्यात आली.
परिसरातील नागरिकांनी सदर बाब पोलिसांचे कानी टाकल्यावर पोलिसांनी या युवकावर कारवाई करीत सदर युवकावर कलम ४/२५ अंतर्गत गुन्हा नोंद केला.
अधिक माहिती घेता या युवकावर यापुर्वी गुंडागर्दी तसेच अनाधिकृत सावकारी करीत असल्याच्या आरोप आहे.
सदर घटनेची पुनरावृत्ती झाल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. याप्रकरणी ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा विवेक बंसोड व चमु पुढील तपास करीत आहेत.
सुर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

Previous articleविद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष अध्ययन स्तर समजण्यासाठी,वस्तूनिष्ठ “प्रारंभिक चाचणीच्या” अंमलबजावणीसाठी प्रामाणिक प्रयत्न करा.
Next articleचुचाळे येथील : यशवंत सुपडू पाटील* (राजपुत) वय ९० माजी सरपंच निधन झाले आहे