हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आज दि.२१/ ८ / २०२१ ला तहसिल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने गॅस इंधन विरोधात निशेध मोर्चा काढण्यात आला व आंदोलन करण्यात आले .व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महिला अध्यक्ष सौ.संगीताताई ठाकरे तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ.कल्पनाताई वानखेडे यांचे प्रमुख उपस्थितीत गॅस व इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करुन मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.यावेळी रेखाताई येवतकर व अस्मिता ताई भडके तालुका अध्यक्ष नांदगाव खंडेश्वर कोहळा जिल्हा जेटेश्वर सरपंच सौ. शोभाताई मोहोड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष मनोज गांवाडे अनिकेत मेश्राम अक्षय गिलबे ग्रामीण तालुक्यातील ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते महीला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते या निशेध मोर्चाचे आयोजन तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ अस्मिता ताई भडके यांच्या उपस्थितीत तहसीलदार साहेब यांना निवेदन देवून मोदी सरकारच्या धोरणा विरोधात निशेध करण्यात आले.