यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
शहरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची १५ ऑगस्ट रोजी घडली. पाच दिवसानंतर पिडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आाला आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली सविस्तर माहिती अशी, यावल शहरातील एका भागात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांसह राहते. १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता तिच्या राहत्या घरात टी व्ही पाहात असतांना तिला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून आणि आमिष दाखवत पळवून नेल्याची घटना घडली. अल्पवयीन मुलीच्या वडीलांसह सर्व नातेवाईकांनी तिच्या मैत्रिणीकडे व नातेवाईकडे प्रत्यक्ष जावून शोध घेतला. परंतू त्यांची मुलगी कुठेच आढळली नाही. पिडीत मुलीच्या वडीलांना काल शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने मुलीला पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.