हिंगणघाट . २३ ऑगस्ट
हिंगणघाट शहरात दिवसेंदिवस डेंगूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वेगाने वाढत चालेला असून यावर नगरपरिषदने तातडीने उपाययोजना करण्याचे मागणिचे निवेदन शहर काँग्रेस हिंगणघाट अध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेस हिंगणघाट च्या वतिने देण्यात आले असून दोन-तीन दिवसांत उपाय योजना केल्या नाही तर हिंगणघाट शहरात तिव्र आंदोलन केल्या जाईल असा सबळ ईशारा देण्यात आला.
कॉंग्रेस पदाधिकारी निवेदन देण्यासाठी गेले असता नगरपरिषद ईमारतित अस्वच्छता व कच-याचे ढिग दिसून आल्याने कॉंग्रेस पदधिका-यान कडून संताप व्यक्त करण्यात आला.
गेल्या 7 दिवसांपासून सफाई कामगार बेमुदत संपावर गेले आहे यामुळे घंटा गाडी,नाली सफाई डेंगुची प्रतिबंधक औषधी फवारणी पुर्णतः हा बंद आहे त्यामुळे रोगराई व अस्वच्छतेचा डोंगर गाठलेला आहे .
हिंगणघाट शहरात डेंगुच्या जीवघेण्या साथरोगाचा प्रादुर्भाव सुरू असून नगरपालीका कुंभकर्णी झोपेत आहे.
नगरपालीकेने शहराचे पालकत्व स्विकारले असते, त्याचं भानं ठेवून नगरपालीकेने जनतेच्या स्वास्थाकडे जाणिवपूर्वक लक्ष द्यावे.अशी मागणी कॉंग्रेस च्या वतिने मुख्याधिकारी जगताप, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले तसेच ठाणेदार चव्हाण,यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आले असून, तातडीने डेंगू सारख्या जिवघेण्या साथरोगावर उपाययोजना केली नाही तर तिव्र आंदोलन करू,असा ईशारा शहर काँग्रेस तर्फे करण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने पंढरीनाथ कापसे माजी नगराध्यक्ष, अध्यक्ष शहर काँग्रेस हिंगणघाट, अमित चाफले जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस, ज्वलंत मून अध्यक्ष किसान कॉंग्रेस हिंगणघाट,नकुल भाईमारे विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस, अंकुश कुचंनवार अध्यक्ष युवक काँग्रेस हिंगणघाट,हुमायू बेग उपाध्यक्ष शहर काँग्रेस हिंगणघाट,सय्यद मेराज अध्यक्ष अल्पसंख्यांक , गुणवंत कारवटकार, पंकज पाके,नागेश जिवणकर, अमोल हरडे,पवन मेश्राम, नितेश कवचकर,श्रीकांन्त देवपल्लीवार, व कार्यकर्ते उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा