हिंगणघाट 24 ऑगस्ट
वर्धा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पेट्रोलपंप हटवून दुसरीकडे घेऊन जाण्याच्या मागणीसाठी आज पेट्रोल पंप हटाव कृती समिती च्या वतीने हिंगणघाट उपविभागीय कार्यालया समोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.आजच्या धरणे आंदोलनात डॉ आंबेडकरी विचारांच्या 16 संघटना
1) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
2) समता सैनिक दल
3) भीम आर्मी
4) निर्माण सोशल फोरम
5) बहुजन समाज पार्टी 6)भारतीय बौद्ध महासभा 7)भिम टायगर सेना
8) सबुद्ध महिला संघटना
9) वंचित बहुजन आघाडी 10)संभाजी बिग्रेड
11)झलकारी सेना
12) विदर्भ विकास आघाडी
13) भारत मुक्ती मोर्चा
14) आंबेडकर राईट इंजिनियर असोशियन
15) डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार व कृती समिती
16) भारतीय संविधान जागृती अभियान सहभागी झालेल्या होत्या.
निवेदनातून या पुतळा परिसरात वर्षभर विविध सामाजिक,सांस्कृतिक,कार्यक्रम होतात.या परिसरात विविध शासकीय कार्यालये आहेत.हजारो नागरिक कामा निमित्ताने या ठिकाणी येतात.डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण करून फटाक्यांची आतिषबाजी विविध कारणाने नेहमीच करण्यात येते. शिवाय या परिसरातील पोलीस मुख्यालया जवळ गॅस सिलेंडरचे गोडाऊन,स्फोटक दारूगोळ्यांचे गोदाम,मंगल कार्यालय आहे एवढे वर्दळीच्या ठिकाणी ज्वलनशील पेट्रोलपंप झाल्यास अपघात होऊन नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.या मुळे हा नियोजित पेट्रोलपंप या ठिकाणाहून हलवून अन्यत्र सुरक्षित जागी करावा अशी या आंदोलकांची मागणी आहे.
आज सकाळी 11 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कृती समिती आंदोलक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर 11 ते 3 या वेळात शांततेत धरणे दिल्यानंतर कृती समितीने उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनले यांना निवेदनातून मागणी आपल्या स्तरावर पेट्रोल पंप हटविण्याच्या संदर्भात कारवाई करावी ही विनंती ,अन्यथा पेट्रोल पंप कृती समितीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यातील गावखेड्यात उग्र आंदोलन करण्यात येईल कायदा सुव्यवस्था बिघडल्यास याची जबाबदारी शासन प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी मागणी संदर्भात एक निवेदन सादर केले.
आजच्या धरणे आंदोलनाचे नेतृत्व वर्धेचे माजी नप अध्यक्ष नीरज गुजर, माजी नगरसेवक अशोक रामटेके,अनिल जवादे,शंकर मुंजेवार,गोरख भगत,गोकुल पाटील,विक्रात भगत, यांनी केले.
या धरणे आदोलनाच्या यशस्वीतेसाठी कुणाल वासेकर,, अनिल मून,मनोज वासेकर,रसपाल शेंदरे, सुहास जीवनकर,ललित धनविज,राजू मेश्राम, विजय तामगाडगे, प्रशांत मेश्राम, अजय डांगरे, पृथ्वीराज मेश्राम , सौ मंगला कांबळे,अनुला सोमकुंवर,सीमा मेश्राम,यांनी परिश्रम घेतले.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा