हिंगणघाट 24 ऑगस्ट
प्रभाग क्रमांक 06 येथे पावसाळा लागला तेव्हापासून कुठल्याही प्रकारे उचीत नियोजन व सोईसुविधा उपलब्ध नाहीत,
मागील काही दिवसांपासून डेंग्यू सारख्या जीवघेणा आजारांनी डोके वर काढले आहेत याचाच परिणाम म्हणून प्रभाग मध्ये प्रत्येक घरात डेंग्यू आणखी संसर्गजन्य रोगांमुळे नागरीक हतबल झाले आहेत, त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
साचलेल्या पाण्यात फवारणी केली तर या रोगाला नक्किच आळा घालता येईल,
प्रभाग मध्ये घंटागाडी नियमीत येत नसल्यामुळे घरी जो कचरा साचतो त्याची वेळेवर विल्हेवाट लागत नाही. परीणामी साचलेल्या कचर्यात दुर्गंधी पसरुन अळी तयार होतात. ज्यामुळे रोगराई ला आमंत्रण स्वताच्याच घरुन मीळते. स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्रभागात दुर्लक्ष होत आहे. नगर पालिका प्रशासनाकडून लवकरात लवकर व्यवस्था
करावी दखल न घेतल्यास एकता प्रतिष्ठानकडून आंदोलन केले जाईल . निवेदन देताना
सुनिल दिवे,प्रवीण शंभरकर,
विनोद कुंभारे,चेतन घुसे,
संदेश थूल,,साहिल कांबळे,प्रज्वल मेंढे,अजित कांबळे,अमित कांबळे,वृषभ इंदुरकर,अखिल धाबर्डे,
इत्यादी उपस्थित होते
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा