अर्जुन कराळे शेगाव प्रतिनिधि
कनारखेड: कनारखेड गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून गुरुवारी एका वृद्धचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करायचे कोठे करायचे म्हनत ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायत इमारत परिसरात तयारी केल्याने खळबळ उडाली आहे.
शेगाव तालुक्यातील कनारखेड गावात स्मशानभूमीसाठी जागाच नाही. गुरुवारी गावातील चंद्रभागाबाई मारुती वाकोडे या महिलेचा रात्री मृत्यू झाला. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे ई क्लास किंवा शासनाची कुठलीही जमीन नाही. ग्रामस्थांनी वेळोवेळी गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी बुलढाणा, पालकमंत्री, आमदार, खासदार यांना निवेदन देऊन स्मशानभूमीसाठी जागेची मागणी केली आहे. गायगाव बु, गायगाव खुर्द, कनारखेड अशा तीन गावांची गट ग्रामपंचायत आहे. गायगाव गट ग्रामपंचायत ने सुद्धा स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याकरता ठराव घेतला आहे. गुरुवारी सकाळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या करमणूक केंद्र परिसरात लाकडे आणून अंत्यविधीसाठी तयारी सुरू केली.
बैलगाडीत लाकडे आणून करमणूक केंद्राचे परिसरात ग्रामस्थ ठाण मांडून बसले आहेत.
कनारखेड गावातील लोकांना अंतिम संस्कार कुठे करावा हा मोठा प्रश्न पडलेला आहे. शासनाचा वारंवार गावकऱ्यांनी पाठपुरावा करूनही आज पर्यंत कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही.
त्यामुळे कणारखेड येथील रहिवाशांनी गावातील गट ग्रामपंचायत चे इमारत परिसरातील कार्यरत असलेले करमणुक केंद्र परिसरात परिसरात येऊन व अंतिम संस्कार च्या लाकडं आणून आम्हाला जागा उपलब्ध करून द्या ग्रामपंचायत परिसरामध्ये आम्ही अंतिम संस्कार करू यासाठी ठाण मांडून येथील नागरिक शासनाविरोधात रोष व्यक्त करत होते.