Home Breaking News पक्षकारांनी लोकअदालत मध्ये मध्यस्ती च्या माध्यमातून आपल्या प्रकरणांचा निपटारा करावे – न्यायालयाचे...

पक्षकारांनी लोकअदालत मध्ये मध्यस्ती च्या माध्यमातून आपल्या प्रकरणांचा निपटारा करावे – न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश एम. एस. बनचरे

743

 

प्रतिनिधी । यावल विकी वानखेडे

न्यायालयात दीर्घकाळ खटले चालवण्यापेक्षा लोक आदालत मध्ये मध्यस्थी करून आपसात तडजोड करीत तात्काळ प्रकरणांचा निपटारा केल्यास वादी व प्रतिवादी दोघांनाही समाधान मिळते व कोण हरलं कोण जिंकलं हे न होता दोघंच जिंकतात म्हणून अधिकाधिक प्रमाणावर पक्षकारांनी लोकअदालत मध्ये मध्यस्ती च्या माध्यमातून आपल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावल न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश एम. एस. बनचरे यांनी केले ते शुक्रवारी येथील न्यायालयामध्ये कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते.
येथील न्यायालयामध्ये शुक्रवारी तालुका विधी सेवा समिती आणि स्थानिक वकील संघाच्या माध्यमातून कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे अध्यक्षस्थानी प्रथमवर्ग न्यायाधीश एम. एस. बनचरे होते तर शिबीराचे उद्घाटन सहदिवाणी न्यायाधीश व्ही. एस. डामरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरामध्ये न्यायाधीश एम. एस. बनचरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की येत्या २५ सप्टेंबर रोजी यावल न्यायालयामध्ये लोकआदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा मोठ्या प्रमाणावर पक्षकारांनी न्यायालयात न्याय प्रतीक्षेत दीर्घकाळ रेंगाळत असलेली प्रकरणांमध्ये समेट घडवून आणला पाहिजे व मध्यस्ती च्या माध्यमातून तडजोड करीत समतोल निकाल लावून घेतला पाहिजे. कारण न्यायालयात खटला चालवतांना वादी किंवा प्रतिवादी यातील एक जिंकतो तर एकाचा पराभव होतो मात्र, जर तुम्ही मध्यस्ती च्या माध्यमातून तडजोड करीत प्रकरण निकाली काढले तर दोघांनाही विजय प्राप्त होतो. म्हणून ना कोई हारा, ना कोई जीता, दोघं जिंकले असा एक वेगळा समाधान असतो आणि आपल्याला न्याय निर्वाळा देखील मिळतो. तेव्हा पक्षकारांनी लोक अदालतीमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. या कायदेविषयक शिबिरात न्यायधिश एम. एस.बनचरे सोबत सह दिवानी न्यायधिश व्ही.एस.डामरे, वकील संघाचे सचिव एड. निलेश मोरे, एड. एस. आर. लोंढे, एड. यु. सी. बडगुजर, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी एस. एस. तडवी, ऍड. देवेंद्र बाविस्कर, सरकारी वकील फरीद शेख सह सर्व वकील संघाच्या सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एड. ए. आर. सुरडकर यांनी केले तर आभार न्यायालय कक्ष अधीक्षक एस. बी. शुक्ला यांनी मानले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी अधिक्षक एस. बी. शुक्ला, सी. एम. झोपे, के.के. लोंढे सह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

Previous articleहिंगणघाट शहरात कंपनी ठेकेदाराकडून कामगारांची पिळवणूक यांच्या समस्यांकडे कामगार अधिकारी यांचे दुर्लक्ष ?
Next articleजिगाव प्रकल्पास डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमसागर नाव द्या करिता एक दिवसीय आंदोलन