प्रधानमंत्री आवास लाभार्थ्यांचे निवेदन न स्वीकारणाऱ्या मुख्यधिकारी यांचा केला निषेध
नांदगाव खंडेश्वर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी शहर कमिटी प्रधानमंत्री आवास योजना वापस लाभार्थी यांचे वतीने तीन दिवसीय राहुटी आंदोलनाची सांगता. एल्गार सभा घेऊन करण्यात आली. सभेला जिल्हा सचिव महादेव गारपवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सभेला तालुका सचिव श्याम शिंदे यांनी एल्गार सभेला संबोधित करताना. म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेचे हप्ते तात्काळ मिळाले पाहिजे पण आवास योजनेची हप्ते घरात बसून मिळणार नाही. त्यासाठी जमिनीवरचा संघर्ष करावा लागेल. व त्याचे नेतृत्व लालबावटाच करेल. आणि येणाऱ्या पुढील काळात नगरपंचायत ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत पाई मार्च काढण्याचा एल्गार पुकारण्यात आला.
प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिल्या लाभार्थी यादीतील 110 लाभार्थ्यांचे घर बांधकाम पूर्ण करण्यासाठी अनुदान वितरित केला, 400 लाभार्थ्यांचे डीपीआर मंजूर आहे. लाभार्थ्यांना अनुदान द्या, प्रस्ताव सादर करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची लॉग इन साईड सुरु करा. वाढत्या मागणीनुसार 5 लाख रुपये घरकुल अनुदान द्या, राहुटी आंदोलनाचे नेतृत्व तालुका सचिव श्याम शिंदे, शहर सचिव अब्दुल मोहसीन, प्रकाश मारोटकर, पुडलिक पुंड, गजानन मारोटकर, देविदास मारोटकर, विनोद गोलाईत, राजेंद्र शामसुंदर, यांनी केले, एलगार सभेला किसान सभेचे अध्यक्ष अनिल मारोटकर, तालुका सचिव दिलीप महल्ले, सुनील बावणे, राजू डोके, रामदास मते, ज्ञानेश्वर शिंदे, शहंशाह, आशिष रावेकर, काचन कटाने, लक्ष्मी सोळंके, अरुणा फुरसुगे, कातेश्वर पुंड, लक्ष्मण झिमटे, बबलू कठाने, राजेंद्र राऊत, दीपक अंबाडरे, रुस्तम भाई, बहादूरखान, वैद्य खा, शे युसूफ, कदीर भाई, बाबाराव वाघाडे, तसेच एल्गार सभेचे प्रास्ताविक राजगुरू शिंदे यांनी केले. व आंदोलनाची सांगता केली मुख्याधिकार्यांना राहुटी आंदोलकानी विनंती केली होती की शुक्रवारला सायंकाळी 5: वाजता निवेदन स्वीकारण्याकरीता यावे निवेदन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नावे होते. त्यावर आवास योजनेच्या 150 लाभार्थ्यांचा सह्या घेऊन हे निवेदन संतत्त लाभार्थ्यांनी नगरपंचायतच्या गेटला चिटकवून निषेध केला. आंदोलकाचे निवेदन न स्वीकारणे ही लोकशाहीची चेष्टा आहे.
आमदार प्रताप अडसड यांनी साधला आंदोलकांशी फोनवरून संपर्क बोलताना म्हणाले की, राहुटी आंदोलनाची या विभागाचे आमदार असल्याने दखल घेतो. तुमाला शब्द देतो की. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या प्रश्न त्वरित काली काली निकाली काढण्याचे फोनवरून बोलताना शब्द दिला. व खासदार साहेब याच्याशी संपर्क करून पाठपुरावा करण्यास सांगतो