यावल प्रतिनिधी विकी वानखेडे
पहुर पोलीस ठाण्यात नुकतेच हजर झालेले पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या अनोख्या अशा Talk With Morning Walk या उपक्रमाची सुरुवात आज शेंदुर्णी पासुन झाली असुन यात जनतेच्या समस्या समजावुन घ्यायच्या ,सर्वसामान्य माणसाची सुरक्षितता अबाधित ठेऊन पोलीस व जनता यांच्या मध्ये विश्वासाचे नातं अधिक दृढ व्हावे यासाठी हा अभिनव प्रयोग पो.नि.अरुण धनवडे हे सातत्याने राबवित असतात.
भल्या पहाटे आपल्या पोलीस स्टेशनच्या एका गावात एकट्यानेच पायी चालत जायचे,तेथे गेल्यानंतर जनतेच्या समस्या, अडचणी समजुन घ्यायच्या व तात्काळ त्यावर कायद्याच्या चौकटीत राहुन त्या समस्येवर मार्ग काढायचा असा पो.नि.अरुण धनवडे यांचा सातत्याने प्रयत्न असतो.
आज पहुर ते शेंदुर्णी हे ११ कि.मी.अंतर पायी चालत जात ते पहाटे शेंदुर्णीत पोहचले ,पो.नि.अरुण धनवडे यांनी पहुर पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारल्यानंतर शेंदुर्णीस त्यांची ही पहिलीच व अनोखा भेट होती.यावेळी शेंदुर्णी दुरक्षेत्र येथे भेट दिली. यावेळी शेंदुर्णीच्या पोलीस पाटील कु.ममता देविदास सुर्यवंशी यांनी व पोलीस बांधवांनी पो.नि.अरुण धनवडे यांचे स्वागत केले. यावेळी शेंदुर्णी पंचक्रोशीतील संवेदनशील गावांची माहिती घेत कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य देत मार्गदर्शक सुचना केल्यात.
या अभिनव उपक्रमाचे सर्व स्थरातुन स्वागत होत असुन साहेब आपल्या गावात ही भावना सर्व सामान्य माणसाला अधिक भावनारी आहे.